जम्मू-काश्मीर : कुलगाममध्ये लष्कराची मोठी कारवाई; पाच दहशतवाद्यांचा खात्मा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

army
जम्मू-काश्मीर : कुलगाममध्ये लष्कराची मोठी कारवाई; पाच दहशतवाद्यांचा खात्मा

कुलगाममध्ये लष्कराची मोठी कारवाई; पाच दहशतवाद्यांचा खात्मा

श्रीनगर : जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा रक्षकांनी पुन्हा एकदा मोठी कारवाई केली आहे. कुलगाममधील पोंबे आणि गोपालपोरा येथे केलेल्या कारवाईत पाच दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. यामध्ये टीआरएफचा कमांडर ठार झाला आहे. सुरक्षा रक्षकांना या भागात दहशतवादी लपल्याची खबर मिळाली होती, त्यानंतर शोध मोहिम राबवण्यात आली. या दहशतवाद्यांकडून मोठ्या प्रमाणावर आयईडी स्फोटकं जप्त करण्यात आली आहेत.

यापूर्वी श्रीनगरच्या हैदरपोरा भागात दहशतवादी आणि सुरक्षा रक्षकांमध्ये सोमवारी झालेल्या चकमकीत दोन दहशतवादी मारले गेले होते यामध्ये एक पाकिस्तानी नागरिक होता. रविवारी टाउनडाउनमध्ये झालेल्या हल्ल्यात त्याचा हात होता. या चकमकीत त्याचे सहकारी देखील मारले गेले आहेत. यामध्ये येथील घराचा एक मालक आहे, ज्यानं दहशतवाद्यांना आश्रय दिला होता. दहशतवाद्यांकडून दोन पिस्तूल आणि इतर सामान जप्त करण्यात आलं आहे.

हेही वाचा: 30 दिवसांत हजर न झाल्यास संपत्ती जप्त? परमबीर सिंगांच्या अडचणीत वाढ

या प्रकरणाच्या तपासासाठी डीआयजींच्या अध्यक्षतेखाली विशेष तपास पथकाची निर्मिती करण्यात आली आहे. तर विरोधी पक्षांनी या घटनेची न्यायालयीन चौकशी करण्याची मागणी केली आहे.

loading image
go to top