CISF Bus Accident: कटरामध्ये CISF जवानांच्या बसला भीषण अपघात; ९ जण जखमी, तिघांची प्रकृती गंभीर, कशी घडली घटना?

CISF Bus Accident: जम्मू आणि काश्मीरमधील कटरा येथे सीआयएसएफच्या बसचा अपघात झाला. त्यात आठ जवान आणि चालकासह नऊ जण जखमी झाले आहेत. रियासी जिल्ह्यातील ताराकोटजवळ बस रस्त्यावरून घसरली.
CISF Bus Accident

CISF Bus Accident

ESakal

Updated on

जम्मू आणि काश्मीरच्या रियासी जिल्ह्यात एक मोठा रस्ते अपघात झाला. माता वैष्णो देवीच्या तळछावणी असलेल्या कटराजवळील ताराकोट परिसरात केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या (CISF) जवानांना घेऊन जाणारी एक बस रस्त्यावरून घसरली. या अपघातात आठ सीआयएसएफ जवान आणि बस चालकासह नऊ जण जखमी झाले. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. तीन जवान गंभीर जखमी झाल्याने त्यांना विशेष उपचारांसाठी जम्मू येथे पाठवण्यात आले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com