जम्मू-काश्मीरच्या सुंदरबन येथे चकमक ; तीन जवान हुतात्मा

जम्मू-काश्मीरच्या सुंदरबन येथे चकमक ; तीन जवान हुतात्मा

नवी दिल्ली : भारतीय सीमेवर पाकिस्तानकडून पुन्हा एकदा घुसखोरीचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, पाकिस्तानचा हा प्रयत्न भारतीय लष्कराने हाणून पाडला. भारतीय लष्कराचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. मात्र, यामध्ये तीन जवान हुतात्मा झाले.

दक्षिण काश्मीरच्या कुलगाम जिल्ह्यात भारतीय सुरक्षा दलाचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये काल (शनिवार) पासून चकमक सुरु होती. या चकमकीत सुरक्षा दलाने तीन दहशतवाद्यांचा खात्मा केला होता. त्यानंतर आता जम्मू-काश्मीरमधील सुंदरबन येथे घुसखोरीच्या प्रयत्नात असलेल्या दोन दहशतवाद्यांचा भारतीय लष्कराने खात्मा केला. मात्र, या कारवाईत लष्कारातील तीन जवान हुतात्मा झाले. तर एक जवान जखमी झाला. 

दरम्यान, पाकिस्तानकडून दिवसभरात दोनदा घुसखोरीचा प्रयत्न करण्यात आला. लष्काराने हा प्रयत्न हाणून पाडला. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com