Anantnag Attack: जम्मू-काश्मीर पुन्हा हादरलं! अनंतनागमध्ये दहशतवादी हल्ला; पोलीस जवान शहीद, हल्ल्याची जबाबदारी कुणी स्वीकारली?

Anantnag Lal Chowk Area Terror Attack: जम्मू आणि काश्मीरमधील अनंतनाग येथे दहशतवादी हल्ला झाल्याचे समोर आले आहे. यात पोलीस कर्मचाऱ्यांवर ५ गोळ्या झाडण्यात आल्या. टीआरएफने हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे.
Anantnag Lal Chowk Area Terror Attack

Anantnag Lal Chowk Area Terror Attack

ESakal

Updated on

जम्मू आणि काश्मीरमधील अनंतनाग येथून एक मोठी बातमी समोर आली आहे. लाल चौकाजवळ झालेल्या दहशतवादी हल्ल्यात एक पोलीस हवालदार शहीद झाल्याचे समोर आले आहे. हल्लेखोर घटनास्थळावरून फरार झाला आहे. दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी शोधमोहीम सुरू आहे. दुपारी सुमारे १२:३५ वाजता अनंतनाग पोलीस ठाण्याच्या हद्दीतील लाल चौकाच्या कोतवाल गल्ली परिसरात काही अज्ञात दहशतवाद्यांनी पोलीस पथकावर गोळीबार केला आहे. यामुळे खळबळ उडाली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com