
जम्मू-कश्मीर : पुलवामामध्ये सुरक्षा दलांवर दहशतवादी हल्ला; एएसआय शहीद
पुलवामा : दक्षिण काश्मीरमधील पुलवामा येथे रविवारी (ता. १७) दहशतवाद्यांनी (Terrorist) सुरक्षा दलाच्या पथकावर हल्ला (Attack) केला. दहशतवादी हल्ल्यात एएसआय विनोद कुमार शहीद झाले. स्थानिक पोलिस आणि सीआरपीएफचे जवान चेकपोस्टवर तपासणी करीत असताना दहशतवाद्यांनी सुरक्षा दलाच्या पथकावर हल्ला केला. ही घटना गोंगू क्रॉसिंग परिसरात घडली. (Terrorist Attack In Jammu and Kashmir)
दहशतवादी (Terrorist) हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी मोर्चेबांधणी केली असून, कारवाई करण्यात येत आहे. रविवारी दुपारी दक्षिण काश्मीरच्या (Jammu and Kashmir) पुलवामा जिल्ह्यातील गोंगू क्रॉसिंगजवळील गोलाकार रस्त्यावर पोलिस आणि सीआरपीएफचे संयुक्त पथक तपासणीत गुंतले होते. यादरम्यान दहशतवाद्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात सीआरपीएफचा एएसआय शहीद झाला.
हेही वाचा: विद्यार्थिनीचा मृत्यू; जमावाने स्कूल बस पेटवली; दगडफेकीत २० पोलिस जखमी
क्रॉसिंगजवळ असलेल्या सफरचंदाच्या बागेतून दहशतवाद्यांनी गोळीबार (Attack) केला. यादरम्यान सीआरपीएफचे एएसआय विनोद कुमार गंभीर जखमी झाले. जखमी विनोद कुमारला रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. हल्लेखोरांना पकडण्यासाठी परिसराची नाकेबंदी करण्यात आली आहे, असे जम्मू-काश्मीर पोलिसांनी सांगितले.
Web Title: Jammu And Kashmir Terrorist Attack Pulwama Asi Death
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..