esakal | जम्मू काश्मीर : लष्करी जवानांकडून तीन दहशतवाद्यांचा खात्मा
sakal

बोलून बातमी शोधा

Jammu and Kashmir

यावेळी तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. या घटनेत एक जवान जखमी झाल्याचेही समजते.  

जम्मू काश्मीर : लष्करी जवानांकडून तीन दहशतवाद्यांचा खात्मा

sakal_logo
By
वृत्तसंस्था

जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे लष्करी जवानांनी तीन दहशतवाद्यांचा खात्मा केलाय. काश्मीर झोनच्या पोलिस अधिकाऱ्यांनी या वृत्ताला दुजोरा दिलाय. मागील 24 तासांतील जम्मू काश्मीरमधील ही दुसरी चकमक आहे. पुलवामा येथील  जदूरा परिसरात लष्करी जवान आणि दहशतवादी यांच्यात रात्री उशीराने चकमक झाली. त्यानंतर लष्कराने या परिसरात शोध मोहिम सुरु केली होती.

राफेल १० सप्टेंबरला हवाई दलात दाखल

यावेळी तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. या घटनेत एक जवान जखमी झाल्याचेही समजते.  एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, ज्या दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला त्यांची ओळख अद्याप पटलेली नाही. यापूर्वी शुक्रवारी शोपियांमध्ये लष्कराने चार दहशतवाद्यांना कंठस्थान घातले होते. लष्कराने मागील 24 तासांत 7 दहशतवाद्यांना खात्मा केला आहे.  

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

शुक्रवारी जम्मू काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात लष्करी सुरक्षा रक्षकांनी  जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या दहशतवाद्यांना डाव उधळून लावला होता. दक्षिण काश्मीरमधील अवंतीपोरा परिसरातील ताकिया गुलबाग त्राल परिसरात दहशतवादी दबा धरुन बसल्याची माहिती मिळाल्यानंतर लष्कराने शोधमोहिमेअंतर्गत दहशतवादी अड्डा नष्ट केला. याठिकाणावरुन आपत्तीजनक सामग्रीही जप्त करण्यात आल्याचेही समोर आले आहे.