राफेल १० सप्टेंबरला हवाई दलात दाखल

rafael
rafael

नवी दिल्ली - भारताच्या संरक्षण सामर्थ्यात भर घालणारे पाच राफेल विमाने येत्या १० सप्टेंबर रोजी भारतीय हवाई दलात अधिकृतरित्या दाखल होणार आहेत. यानिमित्त अंबाला येथील हवाई तळावर विशेष सोहळ्याचे आयोजन केले असून संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. फ्रान्सचे संरक्षणमंत्री फ्लोरेन्स पार्ली सहभागी होण्याची शक्यता आहे. 

गेल्या महिन्यात फ्रान्सहून पाच राफेल विमाने आणण्यात आली. त्यानंतर राफेल विमानाचे प्रशिक्षण देण्यात आले. यादरम्यान राफेल विमानाने लडाख भागात भरारी देखील घेतली. सध्याच्या पाच राफेल विमानातील तीन सिंगल सिटर तर दोन डबल सिटर आहेत. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांचा चार ते सहा सप्टेंबरदरम्यान रशिया दौरा असून मायदेशी परतल्यानंतर राफेल विमानांचा सामील करण्याचा कार्यक्रम निश्‍चित होईल, असे सूत्राने सांगितले. रशियादौऱ्यादरम्यान राजनाथ सिंह हे शांघाय कॉर्पोरेशन संघटनेच्या सदस्य देशांच्या संरक्षण मंत्र्यांची भेट घेणार आहेत. अंबाला येथील हवाई तळावर होणाऱ्या कार्यक्रमासाठी फ्रान्सच्या संरक्षण मंत्र्यांना निमंत्रण दिले आहे. 

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

हवाई दलाची क्षमता वाढणार
राफेलमुळे हवाई दलाचे सामर्थ्य वाढणार आहे. फ्रान्सकडून ३६ राफेल विमाने खरेदी केली असून त्यांची किंमत ६० हजार कोटी एवढी आहे. या व्यवहारापोटीची देण्यात येणारी बहुतांश रक्कम अदा करण्यात आली आहे. या खरेदी व्यवहारावर सप्टेंबर २०१६ रोजी स्वाक्षरी करण्यात आली होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com