Jammu Kashmir Terrorists Arrested : स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात सुरक्षा यंत्रणा अलर्टवर आहे. दरम्यान, जम्मू-काश्मीरच्या हंदवाडा तालुक्यातील कलामाबादमधील वाजिहामा परिसरात लष्कर, पोलिस (Police) आणि सीआरपीएफने संयुक्त कारवाई करून तीन दहशतवाद्यांना अटक केली आहे. या आरोपींची ओळख मोहम्मद इकबाल पंडित, सज्जाद अहमद शाह आणि इश्फाक अहमद मलिक अशी पटली आहे. कारवाईदरम्यान त्यांच्या ताब्यातून शस्त्रे आणि दारूगोळाही जप्त करण्यात आला.