
Summary
कटरा वैष्णोदेवी मार्गावरील भूस्खलनात ३० जणांचा मृत्यू, बचावकार्य सुरू आहे.
मुसळधार पाऊस आणि ढगफुटीच्या धोक्यामुळे यात्रा स्थगित, रस्ते व पूल नुकसानग्रस्त.
जम्मूमधून ५००० लोकांचे स्थलांतर; सैन्य, NDRF आणि CRPF मदत कार्यात तैनात.
जम्मू आणि काश्मीरमधील कटरात वैष्णोदेवी मंदिराजवळ मुसळधार पावसामुळे भूस्खलनात ३० जणांचा मृत्यू झाला आहे. भूस्खलनाच्या दुसऱ्या दिवशी मृतांची संख्या वाढली आहे. मंगळवारी (२६ ऑगस्ट) दुपारी ३.०० वाजता कटरा येथील अर्धकुंवारी येथील इंद्रप्रस्थ भोजनालयाजवळ मोठे भूस्खलन झाला. काही वेळातच ८ जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आले, तर २० जण जखमी झाल्याचे वृत्त होते. आता मृतांची संख्या ३० वर पोहोचली आहे. जम्मूत आजही मुसळधार पाऊस आणि ढगफुटीचा धोका कायम आहे.