Jammu Kashmir : सय्यद सलाउद्दीनचा मुलगा, बिट्टा कराटेची पत्नीसह चौघांना नोकरीहून हटवलं

jammu kashmir four govt sacks four govt employees including bitta karate wife
jammu kashmir four govt sacks four govt employees including bitta karate wife
Updated on

Jammu and Kashmir : जम्मू-काश्मीर प्रशासनाने बिट्टा कराटे यांच्या पत्नीसह दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी असलेल्या चार सरकारी कर्मचाऱ्यांवर मोठी कारवाई केली आहे. बिट्टा कराटे यांची पत्नी जम्मू-काश्मीरच्या प्रशासकीय सेवेत होती, तिला नोकरीवरून काढून टाकण्यात आले आहे. त्याचबरोबर सईद सलाहुद्दीनच्या तिसऱ्या मुलावरही कारवाई करण्यात आली आहे.

सरकारने दहशतवादी बिट्टा कराटेच्या पत्नीसह चार सरकारी कर्मचाऱ्यांना बडतर्फ केले आहे. या चारही कर्मचाऱ्यांना घटनेच्या कलम 311 अन्वये सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे, हे कलम वापरून सरकार अधिक कोणतीही चौकशी न करता त्यांच्या कर्मचाऱ्यांना बडतर्फ करू शकते.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बिट्टा कराटे यांची पत्नी आणि काश्मीर प्रशासकीय सेवेतील अधिकारी इस्बा अर्जुमंद खान यांना जम्मू-काश्मीर सरकारने एलजी मनोज सिन्हा यांच्या सूचनेवरून बडतर्फ केले आहे. त्या 2011 च्या बॅचच्या KAS अधिकारी आणि ग्रामीण विकास विभागातील वरिष्ठ अधिकारी होत्या.

यासोबतच काश्मीर विद्यापीठातील एका शास्त्रज्ञ आणि सहायक प्राध्यापकाचीही हकालपट्टी करण्यात आली आहे. जेकेईडीआयमध्ये व्यवस्थापक म्हणून कार्यरत असलेल्या अब्दुल मुईदलाही बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. अब्दुल मुईद हा बंदी असलेल्या हिजबुल मुजाहिद्दीनचा प्रमुख सय्यद सलाहुद्दीनचा मुलगा आहे. त्याचा दहशतवादी कारवायांमध्ये सहभाग असल्याचा आरोप आहे.

jammu kashmir four govt sacks four govt employees including bitta karate wife
मारुती स्विफ्टचे CNG मॉडेल लाँच; मिळेल दमदार मायलेज

बिट्टा कराटे कोण आहे

बिट्टा कराटे यांचे खरे नाव फारुख अहमद दार आहे. त्यांनी मार्शल आर्ट्सचे प्रशिक्षण घेतल्यामुळे त्यांचे नाव बिट्टा कराटे पडले. तो दहशतवादी आणि फुटीरतावादी नेता यासिन मलिकच्या जेकेएलएफ संघटनेचा सदस्य आहे. बिट्टा हा काश्मिरी पंडित सतीश टिक्कू आणि इतरांच्या हत्येचा आरोपी आहे. 1990 मध्ये सतीश टिक्कू यांची हत्या झाली होती. या हत्येचा आरोप बिट्टा कराटेवर होता. 1991 मध्ये, बिट्टा कराटे यांने एका टीव्ही चॅनेलवरील मुलाखतीदरम्यान कबूल केले की त्यांनी सतीश टिक्कूसह डझनभर काश्मिरी पंडितांना मारले होते, त्यानंतर काश्मिरी पंडितांनी खोऱ्यातून पळ काढला होता. मात्र, नंतर कबुलीजबाब फिरवत बिट्टा यांने आपण कोणाचीही हत्या केली नसल्याचे सांगितले आणि टीव्ही चॅनलच्या दबावाखाली हे विधान केले असल्याचे म्हटले होते.

jammu kashmir four govt sacks four govt employees including bitta karate wife
भाडेकरूंवर ‘कर’भार नाहीच; ‘जीएसटी’ बाबत केंद्राचे स्पष्टीकरण

बिट्टा याला 2019 साली एआयएनने अटक केली होती. तो सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. याआधी, नोव्हेंबर 1990 ते 2006 दरम्यान, खून आणि इतर विविध आरोपांखाली तो जवळपास 16 वर्षे तुरुंगात होता. 2006 मध्ये, टाडा न्यायालयाने त्याच्यावर आरोप निश्चित करण्यात अवाजवी विलंब केल्यामुळे त्याला जामीन मंजूर केला. काही महिन्यांपूर्वी चर्चेत आलेल्या 'द काश्मीर फाइल्स' या चित्रपटात दहशतवादी बिट्टाची क्रूरता आणि लोकांना भडकवणारी मुलाखत दाखवण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com