Indian Army Kills Two Terrorists in Kupwara Encounter
esakal
कुपवाडा सेक्टरमध्ये भारतीय लष्कराने दोन दहशतवाद्यांना ठार केले.
आठ दिवसांत जम्मू-काश्मीरमध्ये झालेली ही दुसरी मोठी चकमक आहे.
अलीकडील कारवायांमुळे दहशतवादी संघटना पीओके ऐवजी खैबर पख्तुनख्वाला सुरक्षित आश्रयस्थान मानू लागल्या आहेत.
Indian Army Kills Two Terrorists in Kupwara Encounter : जम्मू-काश्मीरमधील कुपवाडा जिल्ह्यातील केरन सेक्टरमध्ये लष्कराने (Indian Army) शनिवारी दोन दहशतवाद्यांना ठार केले. हे दहशतवादी नियंत्रण रेषा ओलांडून घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत होते. सूत्रांच्या माहितीनुसार, दोघांचे मृतदेह नियंत्रण रेषेजवळ पडले असून सीमेपलीकडून गोळीबाराचा धोका असल्यामुळे त्यांना बाहेर काढण्यासाठी कडक सुरक्षा व्यवस्थेत कारवाई सुरू आहे. अद्याप दहशतवाद्यांची ओळख पटलेली नाही.