उपराज्यपालांच्या सल्लागारांचा राजीनामा; भाजपात मिळणार मोठी जबाबदारी

Farooq Khan
Farooq Khanesakal
Summary

निवृत्त आयपीएस अधिकारी खान हे भाजपचे राष्ट्रीय सचिव राहिले आहेत.

जम्मू-काश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा (Manoj Sinha) यांचे सल्लागार फारुख खान (Farooq Khan) यांनी काल (रविवार) सायंकाळी आपल्या पदाचा राजीनामा दिलाय. त्यामुळं केंद्रशासित प्रदेशात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीपूर्वी (Jammu and Kashmir Assembly Election) खान यांना भाजपात (BJP) महत्त्वाची जबाबदारी मिळणार आहे. अधिकाऱ्यांनी याबाबत माहिती दिलीय. अधिकाऱ्यांनी सांगितलं की, निवृत्त आयपीएस अधिकारी (IPS Officer) खान हे भाजपचे राष्ट्रीय सचिव राहिले आहेत. त्यांनी पक्षाच्या अल्पसंख्याक आघाडीमध्ये अनेक पदं भूषवली आहेत. 1990 च्या दशकात जम्मू आणि काश्मीरमधील दहशतवाद्यांचं कंबरडं मोडण्यात खान यांची महत्वाची भूमिका होती.

खान यांच्याकडं केंद्रशासित प्रदेशातील पहिल्या विधानसभा निवडणुकीसाठी पक्षाच्या तयारीची जबाबदारी दिली जाण्याची शक्यता आहे. विधानसभा निवडणुकीचं वेळापत्रक अद्याप जाहीर झालं नसलं, तरी ऑक्टोबरनंतर निवडणुका होण्याची अपेक्षा आहे. ऑगस्ट 2019 मध्ये घटनेतील कलम 370 रद्द केल्यानंतर जम्मू आणि काश्मीरचा विशेष दर्जा काढून घेण्यात आला आणि त्याचे दोन केंद्रशासित प्रदेशांमध्ये विभाजन करण्यात आलं.

Farooq Khan
मोदींच्या राज्यात काँग्रेसला मोठा धक्का; दहा आमदार भाजपात प्रवेश करणार?

जुलै 2019 मध्ये खान यांची तत्कालीन लेफ्टनंट गव्हर्नर सत्यपाल मलिक (Satyapal Malik) यांचे सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली. त्यापूर्वी ते लक्षद्वीपचे प्रशासक होते. खान यांनी 1984 मध्ये पोलीस उपनिरीक्षक म्हणून जम्मू आणि काश्मीरमध्ये आपली कारकीर्द सुरू केली आणि नंतर ते पोलीस महानिरीक्षक झाले. 1994 मध्ये त्यांची भारतीय पोलीस सेवेत बढती झाली. त्यानंतर 1994 मध्येच त्यांनी पोलिसांच्या स्पेशल टास्क फोर्सचं (STF) स्वेच्छेनं नेतृत्वही केलं.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com