मोदींच्या राज्यात काँग्रेसला मोठा धक्का; दहा आमदार भाजपात प्रवेश करणार?

Gujarat Assembly Election 2022
Gujarat Assembly Election 2022 esakal
Summary

आमदाराच्या एका ट्विटनंतर गुजरातच्या राजकारणात मोठी खळबळ उडालीय.

Gujarat Assembly Election 2022 : आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी गुजरात काँग्रेसमध्ये (Gujarat Congress) पुन्हा फूट पडण्याची शक्यता आहे. राजस्थानचे मुख्यमंत्री असलेल्या अशोक गेहलोत (CM Ashok Gehlot) यांचे सल्लागार आणि सिरोहीचे आमदार संयम लोढा (Sirohi MLA Sanyam Lodha) यांनी एक ट्विट करून काँग्रेस हायकमांड आणि गुजरातचे प्रभारी रघु शर्मा (Raghu Sharma) यांना इशारा दिलाय.

सिरोहीचे अपक्ष आमदार संयम लोढा यांनी एका ट्विटमध्ये लिहिलंय, भारतीय जनता पक्षाचा गुजरात काँग्रेसच्या 10 आमदारांवर डोळा आहे. त्यामुळं विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजप (BJP) त्यांना आपल्या पक्षात सामील करुन घेऊ शकतं, असा त्यांनी इशारा दिलाय. गुजरात भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष सीआर पाटील यांनी यावेळी विधानसभेच्या सर्व 182 जागा जिंकण्याचं लक्ष्य ठेवलंय. त्यासाठी ते खूप मेहनत घेत आहेत. साम, दाम, दंड, भेद अशा प्रत्येक मार्गानं ते ध्येय गाठण्याचा प्रयत्न करत आहेत. आमदार लोढा यांनी काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी (Rahul Gandhi) आणि राष्ट्रीय सरचिटणीस प्रियंका गांधी (Priyanka Gandhi) यांनाही टॅग केलं असून गुजरातचे प्रभारी रघु शर्मा यांना ही माहिती दिलीय.

Gujarat Assembly Election 2022
कोल्हापुरातील निवडणुकीत 'बिग बॉस' फेम बिचुकलेसह करुणा शर्मा मैदानात

आमदार लोढा पुढे म्हणाले, भाजप काँग्रेसच्या 10 आमदारांवर डोळा ठेवून आहे. त्यांना कोणत्याही क्षणी फोडून विधानसभा निवडणुकीपूर्वी आपल्या पक्षात सामावून घेण्याचा प्रयत्न करत आहे. आमदाराच्या या ट्विटनंतर गुजरातच्या राजकारणात पुन्हा खळबळ उडालीय. आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीत असलेल्या काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये या ट्विटची उत्सुकता होती. मात्र, याबाबत कोणत्याही पक्षानं किंवा नेत्यानं जाहीर भाष्य केलेलं नाही. गुजरातमध्ये काँग्रेस याआधी अनेकवेळा दुफळीचा बळी ठरलंय. 2017 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी पक्षाचे सुमारे दीड डझन आमदार बंडखोर झाले होते. राज्यसभा निवडणुकीतही अनेक आमदारांनी काँग्रेसच्या व्हिपच्या विरोधात जाऊन मतदान केलं होतं.

Gujarat Assembly Election 2022
'ठाकरे सरकार पाडण्यासाठी तारीख पे तारीख; आता भाजपकडून 2024 ची मुदत'

माजी मुख्यमंत्री शंकरसिंह वाघेला (Shankarsinh Vaghela) यांच्या नेतृत्वाखालील डझनभर आमदारांनी राज्यसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसला अलविदा केला होता. राजस्थानमधील काँग्रेस (Rajasthan Congress) समर्थक आमदाराच्या ट्विटनंतर गुजरात काँग्रेसमध्ये पुन्हा खळबळ उडालीय. आता लोक या 10 आमदारांची नावं जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, या 10 संभाव्य आमदारांची नावं अद्याप जाहीर करण्यात आलेली नाहीत. मात्र, या ट्विटमुळं गुजरातच्या राजकारणात खळबळ माजलीय. तरीही काँग्रेसमध्ये निष्क्रिय नेत्यांकडं संशयानं पाहिलं जातंय. त्यानंतर आता काँग्रेसचे काही आमदार संशयाच्या भोवऱ्यात आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com