पाकच्या गोळीबारात दोन जवान जखमी

वृत्तसंस्था
गुरुवार, 29 जून 2017

जम्मू: जम्मू-काश्‍मीरच्या पूँच जिल्ह्यात नियंत्रण रेषेवर शस्त्रसंधीचा भंग करत पाकिस्तानी लष्कराने केलेल्या गोळीबारात आज दोन जवान जखमी झाले. भारतीय जवानांनीही पाकला चोख प्रत्युत्तर दिले.

नियंत्रणरेषेसह पूँच सेक्‍टरमध्ये मध्यरात्री 1.30 वाजण्याच्या सुमारास पाकिस्तानी लष्कराने शस्त्रसंधीचा भंग केला आणि भारतीय चौक्‍यांवर गोळीबार केला. भारतीय जवानांनीही पाकला चोख प्रत्युत्तर दिल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. पाकच्या गोळीबारात भारताचे दोन जवान किरकोळ जखमी झाले आहेत.

दरम्यान, दहशतवाद्याच्या मुद्द्यावरुन अमेरिकेने खडे बोल सुनावले असतानाच सीमा रेषेवर पाकच्या कुरापती पुन्हा एकदा वाढल्या आहेत. बुधवारी दुपारीदेखील पाकिस्तानने भिंबर गली येथे शस्त्रसंधीचे उल्लंघन केले होते. 1 मेपासून पूंच आणि राजौरी येथे पाकिस्तानने अनेकदा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले आहे.

Web Title: jammu-kashmir news pakistan firing and soldier injured