जम्मू काश्‍मीरच्या विकासासाठी जनतेने शांतता राखावी: डॉ. वैद

वृत्तसंस्था
शुक्रवार, 28 जुलै 2017

श्रीनगर: राज्याच्या विकासासाठी आणि समृद्धीसाठी जनतेने शांतता राखणे जरुरीचे आहे, असे आवाहन आज पुन्हा जम्मू काश्‍मीरचे पोलिस महासंचालक डॉ. एस. पी. वैद यांनी केले. दूरदर्शनवरून जनतेला उद्देशून केलेल्या या आवाहनात ते म्हणाले की, राज्याच्या विकासासाठी आणि समृद्धीसाठी जनतेने काम करणे गरजेचे आहे आणि ते शांततेशिवाय आणि सामान्य जनजीवन असल्याशिवाय शक्‍य नाही.

काश्‍मीर सूफी आणि संतांची भूमी आहे. पृथ्वीला स्वर्ग बनविण्याची संधी देऊ नका, असे सांगत ते म्हणाले की, लोक शांतताप्रेमी आहेत. पोलिसांनी यापूर्वीच ड्रगच्या विरोधात मोहीम सुरू केली आहे. व्यसनमुक्ती केंद्राच्या स्थापनेसाठी केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी यापूर्वीच पाच कोटी पाच लाख रुपये मंजूर केले आहेत. राज्य सरकारने ईदगाह मैदानाच्या येथील एक भाग या केंद्रासाठी उपलब्ध करून दिला आहे, असे पोलिस महासंचालकांनी सांगितले.

श्रीनगरच्या पोलिस मुख्यालयात स्थापन करण्यात आलेल्या व्यसनमुक्ती केंद्राच्याद्वारे अनेक जणांचे प्राण वाचविण्यात आले आहेत, असे वैद यांनी सांगितले. हे केंद्र अत्यंत नियमितपणे चालू आहे. येथे सध्या केवळ 15 खाटा असून, आम्हाला अजून खाटांची आवश्‍यकता आहे. मात्र आर्थिक समस्येमुळे आम्ही त्याचा विस्तार करू शकत नाही. येथील ईदगाह मैदानाजवळ लवकरच पूर्ण क्षमतेने हे केंद्र लवकरच चालू करण्यात येणार आहे, असे वैद म्हणाले.

Web Title: jammu-kashmir news People should keep silence: Dr. Vaid