''नमाज'नंतर काश्‍मिरात दगडफेक

वृत्तसंस्था
सोमवार, 26 जून 2017

पाच पोलिस कर्मचाऱ्यांसह 20 नागरिक जखमी

जम्मू: आज साजऱ्या होत असलेल्या ईदनिमित्त नमाज पठणानंतर स्थानिक नागरिकांनी विविध ठिकाणी दगडफेक केल्याचा प्रकार समोर आला आहे. सुरक्षा दले व नागरिकांमध्ये झालेल्या धुमश्‍चक्रीत 20 नागरिकांसह 5 पोलिस कर्मचारी जखमी झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.

पाच पोलिस कर्मचाऱ्यांसह 20 नागरिक जखमी

जम्मू: आज साजऱ्या होत असलेल्या ईदनिमित्त नमाज पठणानंतर स्थानिक नागरिकांनी विविध ठिकाणी दगडफेक केल्याचा प्रकार समोर आला आहे. सुरक्षा दले व नागरिकांमध्ये झालेल्या धुमश्‍चक्रीत 20 नागरिकांसह 5 पोलिस कर्मचारी जखमी झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.

अनंतनागमधील जंगलट मार्केट परिसरात काही नागरिकांनी नमाज पठण केल्यानंतर लागलीच निदर्शनांना सुरवात केली. या वेळी तरुणांच्या एका गटाने सुरक्षा यंत्रणेतील जवानांवर दगडफेक सुरू केल्यामुळे चकमकीला तोंड फुटले. यापाठोपाठ अचलबाग, कुलगम, शोपिया, पुलवामा आणि सोपोर भागातही निदर्शने सुरू होऊन सुरक्षा दलातील कर्मचाऱ्यांवर जोरदार दगडफेक करण्यात आली. सोपोरमध्ये निदर्शकांना आवर घालण्यासाठी पेलेटगनचा वापर करावा लागला.

श्रीनगर येथे निदर्शकांना हुसकावून लावण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराचा वापर केला. या वेळी झालेल्या दगडफेकीत सुरक्षा यंत्रणेचे दोन कर्मचारी गंभीर जखमी झाले. दरम्यान, इतर ठिकाणी शांतता कायम असून, मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी सोनावर येथे कडेकोट बंदोबस्तात नमाज पठण केले. सुरक्षेच्या कारणास्तव विविध मंत्री व इतर व्हीआयपींनी सुरक्षित ठिकाणीच नमाज पठण करावे, असे निर्देश पोलिस महासंचालकांनी दिले होते.

संयम ठेवूनही दगडफेक
ईदच्या पार्श्वभूमिवर अनुचित प्रकार टाळण्यासाठी सुरक्षा दलांनी संयम ठेवण्याचा निर्धार केला होता. मात्र, तरीही काही ठिकाणी दगडफेक झाल्यानंतर नाईलाजास्तव कारवाई करणे भाग पडले, अशी प्रतिक्रिया श्रीनगरमधील एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने दिली.

Web Title: jammu-kashmir news Picketing after Namaz