दहशतवाद्यांचा कट काश्‍मीरमध्ये उधळला

वृत्तसंस्था
शनिवार, 13 जानेवारी 2018

श्रीनगरमधील रस्त्यावर स्फोटकांचा शोध
श्रीनगर: काश्‍मीर खोऱ्यात घातपाताचा कट सुरक्षा यंत्रणांनी शनिवारी सकाळी उधळून लावला. श्रीनगरमधील एचएमटी भागातून जाणाऱ्या श्रीनगर-बारामुल्ला महामार्गावर दहशतवाद्यांनी पाच किलो वजनाची शक्तीशाली स्फोटके पेरली होती. सुरक्षा दलांना याची खबर लागताच त्यांनी स्फोटकांचा शोध घेऊन ती निकामी केली. काश्‍मीरमधील नागरिकांच्या मृत्यूप्रकरणी फुटीरतावाद्यांनी आज "बंद' पुकारला होता.

सुरक्षा दलाच्या रस्ते खुले करणाऱ्या पथकाचे काम सुरू असताना श्रीनगर-बारमुल्ला महामार्गावर दहशतवाद्यांनी स्फोटके पेरल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. सावधगिरी म्हणून तातडीने रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. बॉंबशोधक श्‍वानही घटनास्थळी आणण्यात आले. फुटीरतावाद्यांच्या "बंद'मुळे आज सकाळी या रस्त्यावर तुरळक वाहतूक होती. ती झैनाकोटकडून वळविण्यात आली. बॉंबनाशक पथकाने स्फोटकांचा शोध घेऊन ती निकामी केली. त्यानंतर श्रीनगर-बारमुल्ला रस्त्यावरील वाहतूक सुरळीत झाली, असे सुरक्षा दलांच्या वतीने सांगण्यात आले.

दरम्यान, बंदच्या पार्श्‍वभूमीवर येथील महामार्गावर सुरक्षा दले आणि राज्य पोलिसांची जादा कुमक तैनात करण्यात आली होती. स्फोटके निकामी करताना स्फोटाचा प्रचंड आवाज ऐकू आला, अशी माहिती स्थानिक नागरिकांनी दिली.

Web Title: jammu kashmir news terrorists cut off the conspiracy