

Jammu Kashmir Attack: जम्मू काश्मीरच्या पहलगाम इथं दहशतवादी हल्ला झालाय. दहशतवाद्यांकडून पर्यटकांच्या ग्रुपला टार्गेट करण्यात आलं. या हल्ल्यात सहा जण जखमी झाले आहेत. जखमींमध्ये तीन पर्यटक आहेत तर तीन स्थानिक लोकांचा समावेश आहे. काही घोड्यांनाही गोळ्या लागल्याची माहिती समजते.