काश्मीरमध्ये 'हिज्बुल'चे तीन दहशतवादी ठार

army
army

श्रीनगर :जम्मू काश्मीरमधील शोपियाँ जिल्ह्यात आज (सोमवार) सकाळी सुरक्षा रक्षक आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्य चकमकीत तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. हे तिन्ही दहशतवादी हिज्बुल मुजाहिदीन या संघटनेचे आहेत. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शोपियाँ जिल्ह्यातील वाची भागात आज सकाळी सुरक्षा रक्षकांनी शोधमोहिम राबविली. या दरम्यान दहशतवाद्यांनी सुरक्षा रक्षकांच्या दिशेने गोळीबार केला. या गोळीबाराला प्रत्युत्तर देत झालेल्या चकमकीत तीन दहशतवाद्यांना ठार मारण्यात आले आहे. परिसरात शोधमोहिम सुरु असून, शस्त्रास्त्रे जप्त करण्यात आली आहेत.

दहशतवाद्यांना आत्मसमर्पण करण्यास सांगितल्यानंतर त्यांनी गोळीबार सुरु केला, यानंतर केलेल्या गोळीबारात हे तिन्ही दहशतवादी ठार झाले. हे तिन्ही दहशतवादी हिज्बुल मुजाहिदीन या संघटनेचे असून, त्यांची ओळख पटलेलली नाही, असेही पोलिसांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com