kashmir
kashmirfile photo

काश्मीरमध्ये तीन दहशतवाद्यांचा खात्मा; सुरक्षा दलाची कारवाई

Published on
Summary

जम्मू काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यातील त्राल भागात सुरक्षा दलाने तीन दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे.

श्रीनगर - जम्मू काश्मीरमध्ये पुन्हा एकदा दहशतवाद्यांच्या कारवाया सुरु झाल्या आहेत. जम्मू काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यातील त्राल भागात सुरक्षा दलाने तीन दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. शनिवारी सकाळी सुरक्षा दलाने तीन दहशतवाद्यांना घेरलं होतं. ठार झालेले तीन दहशतवादी हे जैश ए मोहम्मदचे असल्याचे समजते आहे. त्रालमधील जंगल भागात ही चकमक झाली. अद्याप सुरक्षा दलाकडून शोधमोहिम सुरु आहे.

शुक्रवारी पुलवामात दहशतवाद्यांशी चकमक झाली. यात दोन दहशतवाद्यांना ठार करण्यात आलं होतं. दक्षिण काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यातील त्रालमध्ये दहशतवाद्यांनी शिक्षण विभागातील कर्मचारी जावेद अहमदला घरात घुसून गोली मारली होती. यात जावेद अहमद यांचा मृत्यू झाला होता. यानंतर सुऱक्षा दलाने परिसराला घेरले होते.

kashmir
तालिबानबाबत ब्रिटनच्या भूमिकेत अचानक मोठा बदल

दहशतवाद्यांचा शोध अजुनही घेतला जात आहे. अधिकाऱ्यांनी शुक्रवारी रात्री उशिरा दिलेल्या माहितीनुसार, त्रालमधील लुरगाम इथं 35 वर्षीय जावेद अहमद त्यांच्या घरात होते. रात्री साडेनऊच्या सुमारास दहशतवाद्यांनी घरात घुसून गोळी मारली आणि तिथून पळून गेले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com