जम्मू-काश्मीर: लष्कराच्या हेलिकॉप्टरचा अपघात; दोन अधिकारी शहीद

उधमपूरच्या पाटनीटॉप परिसरात हा अपघात झाला आहे.
Helicopter Accident
Helicopter Accident Twitter/@livefirst

जम्मू - काश्मीरच्या उधमपुर जिल्ह्यात लष्कराच्या हेलिकॉप्टरला अपघात (Helicopter Accident) झाल्याची घटना समोर आली आहे. लष्कराच्या हेलिकॉप्टरला झालेल्या या अपघातामध्ये दोन जवानांचा मृत्यू झाला. मेजर रोहित कुमार आणि मेजर अनुज राजपुत हे दोन जवान शहीद झाले आहेत. नॉर्दर्न कमांडचे लेफ्टनंट कर्नल वाय. के. जोशी यांनी दोन्ही अधिकाऱ्यांचा मृत्यू झाल्याचे सांगत, त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. तसेच आपण त्यांच्या कुटुंबीयांच्या दु:खात सहभागी असल्याचे सांगितले आहे.

Helicopter Accident
अदानी समुहाला गंगावरम बंदरात 10.4% गुंतवणुकीची परवानगी

जम्मू -काश्मीर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार स्थानिकांनी उधमपूरच्या पाटनीटॉप परिसराजवळ हेलिकॉप्टर कोसळताना पाहिले होते. आता लष्कराच्या अधिकाऱ्यांनी या दोन्हीही जवानांना विरमरण आल्याची माहीती दिली आहे. लष्कराचे हेलिकॉप्टर या परिसरातून जात असताना हवामान खराब होते. दाट धुक्यांमुळे दृश्यमानता कमी असल्याने पायलट आणि को पायलटला ही परिस्थिती हाताळता न आल्याने हेलिकॉप्टरचे फोर्स लँडींग करावे लागले. या दरम्यान हेलिकॉप्टरवरचे नियंत्रण सुटले आणि हा अपघात झाला. अपघातात जखमी झालेले मेजर रोहित कुमार आणि मेजर अनुज राजपुत यांना या अपघातात वीरमरण आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com