esakal | काश्मीर - नव्या वर्षात घातपाताचा कट उधळला; शस्त्रास्त्रांसह दोन दहशतवाद्यांना अटक
sakal

बोलून बातमी शोधा

jammu kashmir

नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर काश्मीर खोऱ्यात ते मोठा हल्ला घडवून आणण्याचा कट रचत असल्याचीही माहिती यावेळी पोलिसांकडून देण्यात आली. 

काश्मीर - नव्या वर्षात घातपाताचा कट उधळला; शस्त्रास्त्रांसह दोन दहशतवाद्यांना अटक

sakal_logo
By
टीम ई सकाळ

श्रीनगर- येथील नरवल भागात नाकाबंदीदरम्यान प्रवाश्यांची तपासणी सुरू असता दोघांनी तेथून पळ काढण्याचा प्रयत्न केल्यावर जम्मू- काश्मीर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. संबंधित दोघांकडून मोठ्या संख्येत शस्त्रसाठा जप्त करण्यात आला असून ते एका दहशतवादी संघटनेसाठी काम करत असल्याचेही स्पष्ट झाले आहे.  नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर काश्मीर खोऱ्यात ते मोठा हल्ला घडवून आणण्याचा कट रचत असल्याचीही माहिती यावेळी पोलिसांकडून देण्यात आली. 

ख्रिसमसच्या पार्श्वभूमीवर संध्याकाळी ५ वाजेपासून एसओजी नरवलहून श्रीनगरकडे जाणाऱ्या गाड्यांची पोलिसांकडून तपासणी सुरू होती. यादरम्यान काही दहशतवादी स्वयंचलित हत्यारे घेऊन प्रवास करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. यासाठी खास चेक पॉइंट करण्यात आला.  यानंतर  JK18A9967 या क्रमांकाच्या पांढऱ्या अल्टोमध्ये प्रवास करणाऱ्यांची तपासणी केली असता दोघांनी तेथून पळ काढण्याचा प्रयत्न केला.

पोलिसांनी त्यांचा मागोवा घेत दोघांना ताब्यात घेतले. अटक करण्यात आलेल्या दोघांपैकी एक आरोपी हा The Resistance Front या दहशतवादी संघटनेसाठी  काम करत असल्याची माहिती जम्मू-काश्मीर पोलिसांकडून यावेळी देण्यात आली.   

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या चौकशीदरम्यान दरम्यान अटक करण्यात आलेल्यांची नावे रईस अहमद आणि सुबजार अहमद शेख अशी असून रईस हा काजीगुंड येथील तर सुबजार हा कुलगाव येथील रहिवाशी आहे. रईसच्या बॅगची चौकशी केली असत त्याच्याकडून १ एके सीरिजची रायफल, १ पिस्तोल,  २ मॅगझीन,  ६० एके राऊंड आणि  १५ पिस्तोल राऊंड जप्त करण्यात आले.  

हे वाचा - राज्याची प्रतिमा मलिन करण्यासाठी मोदींचा खोटा प्रचार; ममतांचा पलटवार

रईस हा याआधी घडलेल्या चार हल्ल्यांमध्ये सहभागी असल्याची धक्कादायक माहिती पोलिसांना मिळाली आहे. तो टीआरएफसाठी काम करत असल्याची प्राथमिक माहितीही मिळाली असून या संघटनेतील इत संशयितांचाही तपास  पोलिस करत आहेत. या कारवाईमुळे टीआरएफ मॉड्यूलच उद्धस्त होईल आणि या आतंकवादी कारवायांना समर्थन देणाऱ्यांच्या पूर्ण जाळ्याचा तपास लागेल, अशी आशा पोलिसांनी या कारवाईनंतर व्यक्त केली आहे.

loading image