आयपीएस अधिकारी संजीव भट्ट यांना जन्मठेप

वृत्तसंस्था
गुरुवार, 20 जून 2019

गुजरातमध्ये 2002 मध्ये झालेल्या दंगलीवेळी पोलिसांनी नरमाईची भूमिका राबविली असा आरोप संजीव भट्ट यांनी केला होता. त्यावरून त्यांना 2011 मध्ये निलंबित करण्यात आले होते. त्यानंतर 2015 मध्ये त्यांना सेवेतून बडतर्फ करण्यात आले होते.  

जामनगर : तीन दशकांपूर्वी आरोपीची कारागृहात झालेल्या मृत्यूप्रकरणी निलंबित आयपीएस अधिकारी संजीव भट्ट यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. 

गुजरातमधील जानमगर येथील न्यायालयाने संजीव भट्ट यांना तीन दशकांपूर्वीच्या प्रकरणात शिक्षा सुनावली. 1990 मध्ये जामनगरचे अतिरिक्त पोलिस आयुक्त असताना जामजोधपुर शहरात झालेल्या दंगलीप्रकरणी 100 हून अधिक आरोपींना अटक करण्यात आली होती. त्यातील प्रभुदास वैष्णानी यांचा रुग्णालयात मृत्यू झाला होता. त्यांना कोठडीत मारहाण झाल्यावरून भट्ट यांच्यासह आठ पोलिस कर्मचाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. आज या प्रकरणावर सुनावणी पूर्ण होऊन भट्ट यांच्यासह अन्य एकाला जन्मठेपेची शिक्षा सुनावली. 

गुजरातमध्ये 2002 मध्ये झालेल्या दंगलीवेळी पोलिसांनी नरमाईची भूमिका राबविली असा आरोप संजीव भट्ट यांनी केला होता. त्यावरून त्यांना 2011 मध्ये निलंबित करण्यात आले होते. त्यानंतर 2015 मध्ये त्यांना सेवेतून बडतर्फ करण्यात आले होते.  

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Jamnagar Sessions Court sentences former IPS officer Sanjeev Bhatt to life imprisonment in 1990 custodial death case