Ganesh Chaturthi News:
sakal
जमशेदपूर :
जमशेदपूरमधील टेल्को येथील गणेश मंदिर हे धार्मिक श्रद्धेसोबतच विविध संस्कृतींच्या संगमासाठीही ओळखले जाते. पूर्व आणि दक्षिण भारताच्या परंपरांचा सुंदर मिलाफ असलेल्या या मंदिरात कोणत्याही शुभकार्याची पहिली निमंत्रण पत्रिका गणपती बाप्पाच्या चरणी अर्पण करण्याची अनोखी परंपरा आहे. घरबांधणी, गृहप्रवेश, लग्नकार्य किंवा नवीन व्यवसायाची सुरुवात असो, अनेक भाविक सर्वप्रथम बाप्पाला निमंत्रण देतात.