'जन धन'मधील पैशाचा ओघ आटला

पीटीआय
सोमवार, 5 डिसेंबर 2016

सात दिवसांत केवळ 1 हजार 487 कोटी रुपये जमा
नवी दिल्ली - नोटाबंदीच्या निर्णयानंतर जन धन खात्यात सुरू झालेल्या पैशाचा ओघ आटू लागला असून, 30 नोव्हेंबरपर्यंतच्या आठवड्यात या खात्यांमध्ये केवळ 1 हजार 487 कोटी रुपये जमा झाले आहेत.

त्याआधीच्या आठवड्यात यात 8 हजार 283 कोटी रुपये जमा झाले होते.

देशभरात 25.83 कोटी जन धन खाती आहेत. या खात्यांमध्ये 30 नोव्हेंबरपर्यंत 74 हजार 321 कोटी रुपये जमा झाले आहेत. या खात्यांमध्ये 23 नोव्हेंअखेरीस 72 हजार 834 कोटी रुपये जमा होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाचशे व हजारच्या जुन्या नोटा बंद करण्याचा निर्णय 8 नोव्हेंबरला जाहीर केला. तेव्हापासून जन धन खात्यात 28 हजार 685 कोटी रुपये जमा झाले आहेत. या खात्यांवर 9 नोव्हेंबरला 45 हजार 636 कोटी रुपये जमा होते.

या खात्यांमध्ये कमाल 50 हजार रुपये ठेवण्याची मर्यादा आहे. नोटाबंदीच्या निर्णयानंतर या खात्यांचा गैरवापर होऊ नये यासाठी रिझर्व्ह बॅंकेने या खात्यांतून पैसे काढण्याची मर्यादा दरमहा 10 हजार रुपयांवर आणली आहे. काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गरिबांच्या जन धन खात्यांत काळा पैसा ठेवणाऱ्यांना तुरुंगात पाठविण्यात येईल आणि या खात्यांवरील पैसा गरिबांनाच मिळेल, असे म्हटले होते.

शून्य शिलकीच्या खात्यांचे प्रमाण कायम
जन धन खात्यातील जमेत मोठ्या प्रमाणात वाढ झाली असली, तरी शून्य शिलकीची खाती 22.85 टक्के राहिली आहेत. पंतप्रधान जन धन योजनेची सुरवात ऑगस्ट 2014 मध्ये झाली. आर्थिक समावेशकता आणि शेवटच्या व्यक्तीपर्यंत बॅंकिंग व्यवस्था पोचविण्यासाठी या योजनेची घोषणा करण्यात आली होती.

Web Title: jan dhan scheme money decrease