'जनधन'चा गैरवापर करणाऱ्यांवर कारवाई - मोदी

वृत्तसंस्था
रविवार, 4 डिसेंबर 2016

मुरादाबाद - गरिबांच्या "जनधन' खात्यांमध्ये पैसे भरणाऱ्या भ्रष्ट लोकांना कठोर शासन करण्याचा सरकारचा विचार असून, त्यांनी भरलेली रक्कम गरिबांनी काढू नये. तो काळा पैसा गरिबांनाच मिळावा यासाठी सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. माझा कोणी नेताजी अथवा हायकमांड नाही? माझे जे काही आहे ते सगळे तुम्ही लोकच आहात. जनता हीच माझी हायकमांड असून, देशातील प्रत्येक रुपयावर लोकांचा हक्क आहे. विरोधक माझे काय वाकडं करतील? मी तर फकीर माणूस असून, झोळी घेऊन निघालो आहे. या फकिरीनेच मला गरिबांसाठी लढण्याचे बळ दिले.

मुरादाबाद - गरिबांच्या "जनधन' खात्यांमध्ये पैसे भरणाऱ्या भ्रष्ट लोकांना कठोर शासन करण्याचा सरकारचा विचार असून, त्यांनी भरलेली रक्कम गरिबांनी काढू नये. तो काळा पैसा गरिबांनाच मिळावा यासाठी सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. माझा कोणी नेताजी अथवा हायकमांड नाही? माझे जे काही आहे ते सगळे तुम्ही लोकच आहात. जनता हीच माझी हायकमांड असून, देशातील प्रत्येक रुपयावर लोकांचा हक्क आहे. विरोधक माझे काय वाकडं करतील? मी तर फकीर माणूस असून, झोळी घेऊन निघालो आहे. या फकिरीनेच मला गरिबांसाठी लढण्याचे बळ दिले. आज बॅंकांबाहेरील रांगा पाहून ओरडणारी मंडळी कधीकाळी साखर, रॉकेलसाठी देखील रांगा लावाव्या लागत होत्या हे विसरले आहेत. या रांगा संपविण्यासाठी मी शेवटची रांग लावली असा शब्दप्रहार पंतप्रधान मोदी यांनी येथे आयोजित परिवर्तन रॅलीमध्ये बोलताना विरोधकांवर केला. नोटाबंदीच्या ऐतिहासिक घोषणेनंतर पंतप्रधान मोदी यांनी उत्तर प्रदेशमध्ये घेतलेली ही चौथी मोठी सभा होती.

पंतप्रधान म्हणाले की, देशातून गरिबीचे उच्चाटन करण्यासाठी उत्तर प्रदेश, बिहार आणि महाराष्ट्र यासारख्या बड्या राज्यांचा विकास होणे गरजेचे आहे. मी उत्तर प्रदेशातून खासदार बनण्यासाठी निवडणूक लढविली नाही, तर गरिबीचा नायनाट करण्यासाठी येथून लढलो. लोक उपाशी पोटी रांगांमध्ये उभे राहिले, बॅंकांनी पैसे नाही असे जाहीर केल्यानंतर देखील त्यांनी त्यांचा संयम ढळू दिला नाही. तुमची ही तपस्या मी वाया जाऊ देणार नाही. प्रामाणिकपणाचे जेवढे रस्ते मला सापडतील तेवढ्या रस्त्यांवर देशाला नेण्याचा मी प्रयत्न करेल. तुमच्या खात्यामध्ये पैसे असतील तर तुम्ही मोबाईलवरून खरेदी करू शकता. देशामध्ये आज 40 कोटी स्मार्ट फोन आहेत. आता किमान स्मार्ट फोन वापरणारी मंडळी तरी कागदी पैशांच्या वापरापासून मुक्त होतील, असा विश्‍वासही त्यांनी व्यक्त केला.

बदलांचा स्वीकार करणारा देश
आज लोक मोदी-करत असून आधी ही मंडळी केवळ मनी-असा जप करत असत. पैसा गरिबांजवळ राहावा यासाठी माझे प्रयत्न सुरू आहेत. लोकांनी आपल्या जन-धन खात्यामधून पैसे काढू नयेत कारण मध्यमवर्गाकडे काळे धन नसते. बेईमान लोक तुरुंगात जातील पैसा शेवटी गरिबांजवळच राहील. हा हिंदुस्थान असून येथील गरीब अडाणी जनतेला बटन दाबून मतदान कसे करायचे हे माहिती आहे. हा बदलाचा स्वीकार करणारा देश असून, आम्ही देशातील तरुणांना मोबाईल बॅंकिंगचे प्रशिक्षण देत आहोत, असे मोदी यांनी नमूद केले.

म्हणाले

गरिबांचे दु:ख हे माझे दु:ख
गरिबांसाठीच मी रात्रंदिवस काम करतो आहे.
राष्ट्रशक्ती माहिती नसणारे भ्रम पसरवत आहेत.
बॅंकांबाहेरील रांगांमध्ये उभे राहणारे लोक प्रामाणिक
गरिबांच्या घराबाहेर रांगा लावणाऱ्यांची नजर जनधन खात्यांवर
श्रीमंत माणूस आता गरिबांचे पाय धरतो आहे

भ्रष्टाचाराविरोधात लढाई
भ्रष्टाचाराविरोधात लढणारा माणूस कधी गुन्हेगार असू शकतो काय? पण हल्ली अशा लोकांना गुन्हेगार ठरविले जात आहे. मी गरिबांसाठी लढतो आहे हा काही माझा गुन्हा आहे काय? असा सवाल पंतप्रधान मोदी यांनी केला. सरकार केवळ घोषणा करण्यासाठी नसते, तर त्या घोषणांची अंमलबजावणी होणेही गरजचे असते. कधीकाळी मध्य प्रदेश बिमारू राज्य म्हणून ओळखले जात होते, त्याच राज्याचा भाजपने कायापालट करून दाखविला, असे मोदींनी नमूद केले.

Web Title: Janadhan sceheme against those who misuse