जनार्दन रेड्डी पोलिसांसमोर हजर

जनार्दन रेड्डी पोलिसांसमोर हजर

बंगळूर : कथित लाचखोरीच्या प्रकरणात मागील तीन दिवसांपासून बेपत्ता असलेले माजी मंत्री, खाणसम्राट आणि भाजपचे ज्येष्ठ नेते गली जनार्दन रेड्डी आज सायंकाळी बंगळूर पोलिसांच्या गुन्हे शाखेतील कार्यालयामध्ये चौकशीसाठी हजर झाले. तत्पूर्वी गुन्हे शाखेनेच रविवारी रेड्डी यांच्या बळ्ळारीतील निवासस्थानांवर छापे टाकल्यानंतर त्यांच्याविरोधात नोटीस बजावली होती; तसेच त्यांना चौकशीसाठी उपस्थित राहण्यासदेखील सांगण्यात आले होते. 

आज याच पार्श्‍वभूमीवर रेड्डी यांनी एक व्हिडिओ संदेश प्रसारित केला, यामध्ये त्यांनी आपण पळून गेलो नसून हैदराबादेत होतो असे म्हटले आहे. लोकांना सत्य समजावे म्हणूनच आपण संदेश प्रसारित करत आहोत, माझा पोलिसांवर पूर्ण विश्‍वास असून ते कोणत्याही राजकीय दबावाला बळी पडणार नाहीत अशी माझी खात्री असल्याचेही त्यांनी यात म्हटले आहे.

"ऍम्बिडंट ग्रुप' या खासगी उद्योगसमूहाच्या मालकाने रेड्डी यांच्यावर 18 कोटींची लाच घेतल्याचा आरोप केला होता. एका भ्रष्टाचाराच्या प्रकरणातून सहीसलामत सुटका करण्याचे आमिष दाखवून रेड्डी यांनी पैसे लाटले होते. हे पैसे रेड्डी यांच्या निकटवर्तीयांना देण्यात आले होते असे या समूहाच्या मालकाने म्हटले आहे. 

प्रकरण नेमके काय? 

वित्तीय क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या "ऍम्बिडंट ग्रुप'वर शेकडो गुंतवणूकदारांचे सहाशे कोटी रुपये बुडविल्याचा आरोप असून पोलिसांच्या चौकशीदरम्यान या समूहाचा मालक सय्यद अहमद फरीद याने रेड्डी यांनी एका खासगी हॉटेलात आपली भेट घेतली.

तसेच आपल्याला जामीन मिळवून देण्याचे आमिषही दाखविले होते, असा दावा केला आहे. यासाठी आमच्या फर्मने बंगळूरमधील व्यापारी रमेश कोठारीला 18 कोटी रुपये दिले होते. पुढे त्याने ही रक्कम एका सोनाराला दिली आणि त्याचे रूपांतर 57 किलो एवढ्या सोन्यात करण्यात आले होते. हेच सोने जनार्दन रेड्डी यांचा निकटवर्तीय अली खान याच्याकडे सुपूर्द करण्यात आले होते, असे पोलिसांनी म्हटले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com