Jantar Mantar Protest Crime Data : जंतर-मंतरवरील आंदोलनात घुसले गुन्हेगारी पार्श्वभूमीचे १००० लोक; AI ने ओळखले चेहरे, पोलीसही चकित

CJP Protest Delhi : जंतर-मंतर आंदोलन परिसरातील २,८७३ लोकांची तपासणी झाली, त्यापैकी सुमारे ९८० जणांची गुन्हेगारी पार्श्वभूमी आढळली. १०१ जण हत्या प्रकरणांत, तर ६२ जण हत्येच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यांत सहभागी असल्याचे निष्पन्न झाले.
Jantar Mantar Protest

Police personnel monitoring crowd during the CJP protest at Jantar Mantar

esakal

Updated on

Jantar Mantar Protest: दिल्लीतील जंतर-मंतर येथे 'कॉकरोच जनता पार्टी'च्या (CJP) आंदोलनाच्या ठिकाणी किंवा आसपास परिसरात असलेल्या एकूण २,८७३ व्यक्तींची तपासणी करण्यात आली; त्यापैकी ९८० हून अधिक व्यक्तींची गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याचे आढळून आले. या व्यक्ती कथितरीत्या हत्या, हत्येचा प्रयत्न, लुटालूट, बलात्कार, अपहरण, महिलांविरुद्धचे गुन्हे, बेकायदेशीर शस्त्रे आणि अमली पदार्थ यांसारख्यागुन्ह्यांमध्ये सामील असल्याची माहिती अधिकृत सूत्रांनी दिली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com