

Iron Plates, Welded Barricades at Jantar Mantar
Esakal
राजधानी दिल्लीत जंतरमंतरवर विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू आहे. नीट पेपर फुटी प्रकरणी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यावर आंदोलक ठाम आहेत. जंतर मंतरवर आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी देशभरातून तरुण तरुणी दाखल होत आहेत. यातच संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरू असल्यानं जंतर मंतरसह दिल्लीत पोलिसांनी कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात केली आहे. आंदोलनात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी खबरदारी घेतली जात आहे. जंतर मंतर परिसरात पोलिसांनी रस्त्यावर लोखंडाच्या मोठ्या प्लेट्स फिक्स केल्या आहेत. बॅरिकेड्स हलवता येऊ नयेत किंवा ते पाडता येऊ नयेत यासाठी पोलिसांनी तयारी केलीय. Jantar Mantar Turned Into High-Security Zone