याला म्हणतात नशीब! फक्त 6 रुपयांच्या लॉटरीने जिंकला 1 कोटीचा जॅकपॉट! लॉटरी तिकिट कुठे आणि कसं घेतलं? कामगाराचं बदललं नशीब
Jasmel Singh Lottery Winner : जसमेल सिंग हा पंजाबमधील मोगा जिल्ह्यात राहणारा एक सामान्य कामगार आहे. रोजंदारीवर काम करत असताना त्याच्यावर २५ ते ३० लाख रुपयांचं कर्ज (Loan) जमा झालं होतं.
मोगा (पंजाब) : "नशीब कधी आणि कसं पालटेल, याचा काही नेम नाही," हे म्हणणं जणू जसमेल सिंगच्या आयुष्याला लागू होतं. केवळ ६ रुपयांचं लॉटरी तिकिट खरेदी करून जसमेल सिंगने (Jasmel Singh Lottery Winner) थेट १ कोटी रुपयांचा बंपर जॅकपॉट जिंकला आहे.