Taliban Minister’s Welcome in India
esakal
अफगाणिस्तानच्या तालिबान सरकारचे विदेशमंत्री आमिर खान मुत्तकी सध्या भारत दौऱ्यावर आहेत. यादरम्यान उत्तर प्रदेशमधील देवबंद येथे त्यांचं जोरदार स्वागत करण्यात आलं आहे. मात्र, यावरून प्रसिद्ध लेखक आणि चित्रपटकार जावेद अख्तर यांनी नाराजी व्यक्त केली आहे. तालिबानी मंत्र्याचं अशाप्रकारे स्वागत बघून माझी मान शरमेने खाली गेली, अशी संतप्त प्रतिक्रिया त्यांनी दिली.