Javed Akhtar on Delimitation Bill
esakal
केंद्रातील मोदी सरकार संसदेत डिलिमिटेशन विधेयक मांडण्याच्या तयारीत आहे. या विधेयकावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये राजकीय संघर्ष सुरू असतानाच आता गीतकार जावेद अख्तर यांनीही आपली भूमिका मांडली आहे. ज्या भागांनी कुटुंब नियोजनाला प्राधान्य दिलं नाही, त्या भागांना अधिक लोकसभा जागा दिल्या जात आहेत, तर कुटुंब नियोजन स्वीकारणाऱ्या भागांना कमी जागा मिळत आहेत, असं म्हणत त्यांनी या प्रक्रियेवर प्रश्न उपस्थित केला आहे. तसेच या विधेयकावर विरोधी पक्षातील कोणते नेते पाठिंबा देतात आणि कोण विरोध करतात, याकडेही आपलं लक्ष असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.