"नेहरू काश्मीरचा मुद्दा UN मध्ये का घेऊन गेले?"; निर्मला सीतारामन यांचा सवाल

Jawahar Nehru internationalized Kashmir issue by taking to un way says Nirmala Sitharaman
Jawahar Nehru internationalized Kashmir issue by taking to un way says Nirmala Sitharaman Sakal

सध्या द काश्मीर फाईल्स या चित्रपटामुळे देशातील राजकारण ढवळून निघाले आहे. यातच काश्मिर प्रश्नाबाबत बोलताना केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बुधवारी भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यावर काश्मिरचा मुद्दा संयुक्त राष्ट्रात घेऊन जात त्याचे आंतरराष्ट्रीयीकरण केल्याचा आरोप केला. हा मुद्दा जागतिक मंचावर जाऊ नये कारण हा भारतीय मुद्दा आहे, असे देखील त्यांनी पुढे सांगितले.

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील पहिले युद्ध सुरू झाल्यानंतर जानेवारी 1948 मध्ये दाखल करण्यात आलेल्या याचिकेद्वारे पंतप्रधान नेहरू यांनी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेकडे दाद मागितली होती. या याचिकेच्या आधारे सुरक्षा परिषदेने भारत आणि पाकिस्तानसाठी संयुक्त राष्ट्र आयोगाची स्थापना दोन्ही देशांमधील मध्यस्थी करण्यासाठी केली होती.

राज्यसभेत बोलताना अर्थमंत्री निर्मला सीतारामन म्हणाल्या, “हा मूलत: भारताशी संबंधित मुद्दा आहे. काँग्रेसने हा मुद्दा संयुक्त राष्ट्रात नेला. कोणी नेला? आपले पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी हा मुद्दा संयुक्त राष्ट्रात नेला. का? कारण ब्रिटीशांनी त्यांना काही सूचना केल्या असतील की अन्यथा हा मुद्दा सोडवला जाणार नाही आणि पंतप्रधान नेहरूंनी ते संयुक्त राष्ट्रात नेले"

Jawahar Nehru internationalized Kashmir issue by taking to un way says Nirmala Sitharaman
लॉंच होताच Maruti ही कार ठरतेय हीट; ग्राहकांकडून प्रचंड मागणी

पाकिस्तानचा उल्लेख करत अर्थमंत्र्यांनी पुढे सांगितले की, पंतप्रधान नेहरू काश्मीरचा मुद्दा संयुक्त राष्ट्रात घेऊन गेले त्याचा, आजपर्यंत आपले शेजारी त्याचा गैरवापर करत आहेत. असेही त्या म्हणाल्या.

काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे हे सांगत निर्मला सीतारामन पुढे म्हणाल्या की, “हा एक मुद्दा आहे जो जागतिक मंचावर जाऊ नये. ही मूलत: भारतीय समस्या आहे, ती आपण हाताळू शकलो असतो. आम्ही आता ते हाताळत आहोत आणि फरक दिसत आहे.”

Jawahar Nehru internationalized Kashmir issue by taking to un way says Nirmala Sitharaman
जास्त व्हॅलिडिटी असलेले बेस्ट प्लॅन्स; मिळते फ्री कॉलिंग, डेटा अन् बरंच

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com