
हातात बंदुक अन् खांद्यावर स्ट्रेचर, जवानाचा तो व्हिडिओ जिंकतोय मने
इंटरनेटच्या दुनियेत सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल, काही सांगता येत नाही, अशा घटनांपैकी कीही गोष्टी या नक्कीच हृदयाला दिलासा देणाऱ्या आहेत. सध्या असाच एक व्हिडिओ जोरात व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एका जवानाने एका गर्भवती महिलेला मदत करत नेटकऱ्यांची मने जिंकली आहे. हा व्हिडिओ पाहून तुम्हाला पुन्हा एकदा भारतीय लष्कराच्या जवानाचा अभिमान वाटेल.
छत्तीसगडच्या दंतेवाडा जिल्ह्यात एका जवानाने एका गर्भवती महिलेला तात्पुरत्या स्ट्रेचरवर रुग्णालयात नेण्यास गावकऱ्यांना मदत केली. एका हातात बंदूक तर खांद्यावर खाटेला बांबू लावून तयार केलेले स्ट्रेचर घेऊन 3 किलोमीटरपर्यंत चालत प्रवास केला. गावात रुग्णवाहीका जाण्यासाठी रस्ता नसल्याने DRG अधिकार्यांनी एका खाटेचे स्ट्रेचर बनवले आणि एका अरुंद रस्त्यावरून महिलेला घेऊन जाताना स्थानिकांची मदत करत असलेल्या जवानाचा हा व्हिडिओ ऑनलाइन समोर आला आहे.
हेही वाचा: गुगलचा मोठा निर्णय, अँड्रॉईड फोनवर बंद होणार कॉल रेकॉर्डिंग ॲप्स
दंतेवाडा जिल्ह्यातील कुआकोंडा गावाचा रस्ता नक्षलवाद्यांनी उडवला होता, ज्यामुळे गावकऱ्यांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. यातच गावातील महिलेला प्रसूती वेदना सुरू झाल्यावर गावकऱ्यांनी तिला 90 किलोमीटर दूर असलेल्या पालनार रुग्णालयात नेण्यासाठी धावपळ केली. डीआरजी जवान गावात चालत गेले आणि त्यांनी खाटेच्या दोन्ही बाजूला बांबू बांधून स्ट्रेचर तयार करत गावकऱ्यांची मदत केली आणि महिलेला गावाबाहेर उभ्या असलेल्या वाहनापर्यंत नेले.
बस्तरचे आयजी पी सुंदरराज यांनी सांगितले की, महिला आणि तिचे मूल पूर्णपणे ठीक आहे. मदत करणारी व्यक्ती जिल्हा राखीव रक्षक दलातील शिपाई आहे. आता लोक त्या जवानाची स्तुती करत आहेत. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, महिला आणि तिचे मुल दोघेही सुखरूप आहेत.
हेही वाचा: भारतातील टॉप सहा सर्वाधिक मायलेज देणाऱ्या कार, पाहा यादी
छत्तीसगडमधील दंतेवाडा आणि बस्तर भागात सुरक्षा कर्मचाऱ्यांना गावात प्रवेश करण्यापासून रोखण्यासाठी नक्षलवादी अनेकदा रस्ते उडवतात. त्यामुळे ग्रामस्थांना त्रास होतो. गेल्या महिन्यात, नक्षलवाद्यांनी बस्तर क्षेत्रातील सुकमा जिल्ह्यात सुरक्षा दलांच्या नव्याने उभारलेल्या छावणीवर केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या जवानांवर गोळीबार केला होता. या चकमकीत सीआरपीएफचे तीन जवान जखमी झाले.
हेही वाचा: इन्फोसिसनंतर 'टाटा स्टील'चा मोठा निर्णय; रशियासोबत बंद केला व्यवसाय
Web Title: Jawan Carry Pregnant To Hospital On Cot Heart Winning Video Goes Viral
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..