जवानाला बोहल्यावर नव्हे तर तिरंग्यात पहाण्याची वेळ...

वृत्तसंस्था
सोमवार, 4 जून 2018

फतेहपूर (उत्तर प्रदेश): पाकिस्तानने केलेल्या गोळीबारात दोन जवान हुतात्मा झाले. दोन जवानांमध्ये फतेहपूरमधील विजय पांडे यांचा समावेश आहे. विजय पांडे यांचा 20 जून रोजी विवाह होणार होता. मात्र, विजय यांना बोहल्यावर पाहण्याऐवजी तिरंग्यामध्ये पाहण्याची वेळ नातेवाईकांवर आली अन् एकच आक्रोश उडाला.

सीमा सुरक्षा दलाचे जम्मू फ्रंटियरचे महानिरीक्षक राम अवतार यांनी दिलेल्या माहितीनुसार, 'पाकिस्तानी सैनिकांनी रविवारी (ता. 3) रात्री सव्वाच्या सुमारास प्रगवालमधील आंतरराष्ट्रीय सीमेवर गोळीबार सुरू केला. यावेळी दोन्ही बाजूंनी जोरदार गोळीबार झाला. यामध्ये सहाय्यक उपनिरीक्षक एस. एन. यादव व कॉन्स्टेबल विजय पांडे गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, त्यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले.

विजय हे 2012 मध्ये सीमा सुरक्षा दलात भरती झाले होते. 20 जून रोजी त्यांचा विवाह होणार होता. विवाहाची जोरदार तयारी सुरू होती. पत्रिका वाटून झाल्या होत्या. परंतु, विजय यांना बोहल्यावर पाहण्याऐवजी त्यांना तिरंग्यात पहावे लागले. विजय यांचा मृतदेह गावात आल्यानंतर एकच आक्रोश उडाला. फतेहपूरमधील सठिगवा गावात विजय पांडे यांना अंतिम निरोप देण्यात आला आहे. यावेळी मोठ्या संख्येनं ग्रामस्थ उपस्थित होते.

विजयचे वडिल म्हणाले, 'विजय सोबत शनिवारी (ता. 2) सांयकाळी मोबाईलवरून बोलणे झाले होते. विवाहाची तयारी झाल्याचे त्याला सांगत असताना आनंद होत होता. शिवाय, त्याने सुट्टी मंजूर झाल्याचेही सांगितले होते. परंतु, रविवारी तो हुतात्मा झाल्याचे समजले अन् मोठा धक्का बसला.'

Web Title: Jawan vijay pandey killed in Pak firing was supposed to get married in 2 weeks