निवृत्तीनंतर 64 व्या वर्षी MBBS ला प्रवेश; जाणून घ्या कोण आहेत जय किशोर प्रधान

jay kishor pradhan
jay kishor pradhan

भूवनेश्वर: असं म्हणतात की, शिकण्याचं वय कधी संपत नाही. याचीच अनुभूती स्टेट बॅंकेत काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याच्या जिद्दीवरुन दिसून आलं आहे. स्टेट बँकेतून निवृत्त झालेल्या या कर्मचाऱ्याने आपले संपूर्ण आयुष्य बँकेत घालवले आणि आता निवृत्तीनंतर वैद्यकीय शिक्षण घेत आहेत. ओडिशाचे जय किशोर प्रधान वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेशासाठी असणाऱ्या NEET परीक्षेत उत्तीर्ण झाले असून ते आता एमबीबीएसच्या पहिल्या वर्षाला शिकत आहेत. स्टेट बँकेतून निवृत्त झालेले जय किशोर प्रधान म्हणतात की, त्यांना आयुष्यभर इतरांची सेवा करायची आहे.

ओडिशाच्या गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये प्रवेश-
विशेष म्हणजे एका 64 वर्षीय वृद्धाला एमबीबीएसमध्ये प्रवेश देणे हा भारतीय वैद्यकीय शिक्षणाच्या इतिहासातील एक दुर्मिळ क्षण आहे. स्टेट बँकेतून निवृत्त झालेल्या प्रमुख अपंग आरक्षण श्रेणीत सरकारी वीर सुरेंद्र साई इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस अँड रिसर्चमध्ये (वीआईएमएसएआर) प्रवेश घेतला आहे. वीआईएमएसएआरचे संचालक ललित मेहर म्हणतात की, देशाच्या आरोग्य शिक्षण क्षेत्रातही ही दुर्मिळ संधी आहे आणि प्रधानांनी या टप्प्यावर वैद्यकीय विद्यार्थी म्हणून प्रवेश घेऊन एक आदर्श घालून दिला आहे.

70 व्या वर्षी होणार डॉक्टर-
प्रधानांनी या वर्षी सप्टेंबरमध्ये नॅशनल एलिजिबिलिटी एन्ट्रन्स टेस्ट (नीट) परीक्षा दिली होती. यामध्ये उच्च वयोमर्यादा निश्चित नाही. प्रधान यांनी परीक्षेत चांगले गूण मिळवलं आहे, त्यामुळे ते वीआईएमएसएआरसाठी पात्र ठरले आहेत. बारगढ येथील एका रहिवाशाने सांगितले की, नुकत्याच झालेल्या एका जुळ्या मुलीच्या मृत्यूमुळे त्यांना नीटची परीक्षा देऊन एमबीबीएसच्या अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठी प्रोत्साहन मिळालं होतं. प्रधान यांनी वयाच्या ६४ व्या वर्षी प्रवेश घेतला असून वयाच्या ७० व्या वर्षापर्यंत एमबीबीएसचा अभ्यासक्रम पूर्ण करणार आहेत. प्रधान म्हणतात की, अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर व्यवसाय म्हणून करतील आणि इतरांना मदतही करतील.

(edited by- pramod sarawale)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com