आरोपींना झुंडीच्या हवाली करा; संसदेत जया बच्चन संतप्त

वृत्तसेवा
सोमवार, 2 डिसेंबर 2019

राज्यसभा खासदार जया बच्चन यांनी "त्या बलात्कारींना झुंडीच्या हवाली करा, आणि त्यांचा झुंडबळी जाऊ द्या.' अशी मागणी केली आहे. जया यांच्या या सल्ल्यानंतर अध्यक्ष व्यंकय्या नायडूदेखील अवाक झाले होते. तर, काही सदस्यांनी अशा प्रकारच्या गुन्ह्यांसाठी ठराविक मुदतीत दोषींना शिक्षा देणारे कठोर कायदे करण्याची मागणी राज्यसभेत केली.

नवी दिल्ली : राज्यसभा खासदार जया बच्चन यांनी "त्या बलात्कारींना झुंडीच्या हवाली करा, आणि त्यांचा झुंडबळी जाऊ द्या.' अशी मागणी केली आहे. जया यांच्या या सल्ल्यानंतर अध्यक्ष व्यंकय्या नायडूदेखील अवाक झाले होते. तर, काही सदस्यांनी अशा प्रकारच्या गुन्ह्यांसाठी ठराविक मुदतीत दोषींना शिक्षा देणारे कठोर कायदे करण्याची मागणी राज्यसभेत केली.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे एप

जया बच्चन म्हणाल्या, 'यांना राज्यसभेतील चर्चेदरम्यान भावनांवर नियंत्रण ठेवता आले नाही. त्यांनी या घटनेबद्दल तीव्र शब्दात रोष व्यक्त केला. यावेळी त्या म्हणाल्या, की अशा घटनांमधील आरोपींना झुंडीच्या हवाली करायला हवं, अशा आरोपींचा झुंड बळी जाऊ दिला पहिजे.

आणखी वाचा : भाजपनेत्याचेच विधान खोडून काढण्याची फडणवीसांवर आली वेळ 

हैदराबादमधील पशुवैद्यकीय डॉक्‍टर तरुणीवर झालेल्या सामूहिक बलात्कार आणि हत्येच्या घटनेचे पडसाद संसदेच्या अधिवेशनातही उमटले आहेत. दोन्ही सभागृहातील नेत्यांनी या घटनेचा तीव्र निषेध केला आहे. यावेळी खासदारांनी आरोपींना फाशीची शिक्षा, जमावाच्या हवाली करण्याची मागणी केली आहे.

आणखी बातमी : बहुचर्चित रामटेक बंगला पुन्हा भुजबळांकडे; पाहा कोण कोठे राहणार

दरम्यान, सदस्यांचे म्हणणे मांडून झाल्यावर लोकसभा अध्यक्ष व्यंकय्या नायडू म्हणाले, अशा प्रकारच्या अमानुष घटना कायद्याद्वारे नव्हे तर राजकीय इच्छाशक्तीद्वारे निकाली काढल्या जाऊ शकतात. आता तर अशा घटनांचा फास्टट्रॅक न्यायालयात लवकर निकाल लागतो. मात्र, हे आरोपी अपीलांवर अपील करून स्वत:चा बचाव करत राहतात. त्यांना अशा गुन्ह्यानंतर अपील का करु दिला जातो हे समजण्या पलिकडचे आहे अशी ते यावेळी म्हणाले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Jaya Bachchan speaking on growing incidents of rape in India in Rajya Sabha