esakal | बहुचर्चित रामटेक बंगला पुन्हा भुजबळांकडे; पाहा कोण कोठे राहणार?
sakal

बोलून बातमी शोधा

bhujbal got ramtek bunglow fadnavis sagar jayant patil seva sadan

बहुचर्चित रामटेक बंगला पुन्हा भुजबळांकडे; पाहा कोण कोठे राहणार?

sakal_logo
By
टीम ई-सकाळ

मुंबई : महाविकास आघाडीच्या सत्ता स्थापनेत शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने एकत्र येत सत्ता स्थापन केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सोबत प्रत्येक पक्षातून दोन नेत्यांनी शपथ घेतली आहे. त्यानंतर आज निवास्थानाचे वाटप करण्यात आले आहे. या रामटेक हे निवासस्थान पुन्हा एकदा भुजबळांना मिळाले आहे. रामटेक बंगला आणि त्याच्याशी निगडीत योगायोगाची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे एप

काय आहे रामटेकची कहाणी?
मंत्री, त्यांची निवासस्थान आणि दालन यावरून उलट-सुलट चर्चा नेहमीच सुरु असतात. अशीच एक चर्चा रामटेक बंगल्याबद्दलही बोलली जाते. आघाडीच्या सत्ता काळात रामटेक हे निवासस्थान छगन भुजबळ यांचे होते. त्यानंतर कथित भ्रष्टाचाराचे आरोप होऊन भुजबळ यांना पदावरून पायउतार व्हावे लागले. नंतर युतीच्या सत्तास्थापनेत हा बाग्नग्ला माजी मंत्री एकनाथ खडसे यांना मिळाला. त्यांनाही अशाच एका आरोपाला सामोरे जात आपल्या पदाचा राजीनामा दयावा लागला होता. यामुळे खडसेंच्या राजीनाम्यानंतर बराच काळ या बंगल्याला मालक मिळाला नव्हता. नंतरच्या काळात तिथे पर्यटन खात्याचे माजी मंत्री जयकुमार रावल राहिले. त्यांच्याही मागे चौकशीच्या ससेमीरा लागेल, अशी चर्चा रंगली आहे. 

आणखी बातम्या - भाजप नेत्याचे विधान खोडून काढण्याची फडणवीसांवर आली वेळ 

उद्धव ठाकरे वर्षा बंगल्यावर जाणार?
महाराष्ट्र विधानसभेच्या २०१९ च्या निकालानंतर महिनाभर रंगलेले सत्ता नाट्य नुकतेच संपले. 'महाविकास' आघाडीचे मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांनी पदभार स्वीकारला आहे. शपथ विधी आणि अधिवेशनानंतर प्रथेप्रमाणे मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवास्थान 'वर्षा' बंगला हा आता ठाकरे याना देण्यात आला आहे. या निवडणुकीत पहिल्यांदाच ठाकरे कुटुंबीय थेट सत्तेत सहभागी झाले आहेत. ठाकरेंचे निवासस्थान आणि शिवसेनेचे सत्ताकेंद्र 'मातोश्री' बांगला सर्वज्ञात आहेच. नुकतेच ठाकरेंचे नवे घरही चर्चेत आले होते. अशात ठाकरे 'वर्षा' निवासस्थानी रहायला जातील का यावर चर्चांना उधाण आले आहे.

फडणवीसांना सागर बंगला
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विरोधीपक्ष नेतेपदी निवड झाली आहे. त्यांना राज्याच्या मंत्रिपदाचा दर्जा आहे. वर्षा या मुख्यमंत्री निवासस्थानातून आता त्यांचे निवासस्थान सागर बंगला असणार आहे. अद्याप मंत्रिपदाची शपथ घेतलेल्या बाळासाहेब थोरात यांना कोणताही बंगला देण्यात आलेला नाही. 

आणखी बातम्या - पंकजा मुंडेंचा पुन्हा भाजपला धक्का पाहा काय केले?

जयंत पाटील यांचे निवासस्थान कोणते?
यात सेवासदन  हे निवासस्थान जयंत पाटील यांना मिळाले आहे. २०१४ पूर्वी आघाडीच्या सत्ताकाळात सेवासदन हे निवासस्थान काँग्रेसचे बाळासाहेब थोरात यांना देण्यात आले होते. त्या वेळी बाळासाहेब थोरात यांच्याकडे महसूल खाते होते. नंतरच्या सत्ताबदलात हे निवासस्थान भाजपचे तत्कालीन मंत्री विनोद तावडे यांना मिळाले. तावडे यांच्याकडे शिक्षण मंत्री म्हणून कार्यभार होता. हा बंगला जयंत पाटील यांना देण्यात आलाय. दरम्यान, जयंत पाटील यांचा आधीचा बंगला आता एकनाथ शिंदे यांना देण्यात आला आहे. आघाडीची सत्ता गेल्यानंतर युतीच्या काळात या बंगल्यात पंकजा मुंडे यांचे निवासस्थान होते. आता हा बंगला एकनाथ शिंदे यांना देण्यात आला आहे. 

आणखी बातम्या - रोहित पवार, विश्वजीत कदम खेळण्यांच्या दुकानात

महत्त्वाचे बंगले आणि नेते 

  • रामटेक - आघाडीच्या काळात छगन भुजबळ - युतीत एकनाथ खडसे - जयकुमार रावल  - महाविकास आघाडीत - पुन्हा छगन भुजबळ  
  • सेवा सदन - आघाडीच्या काळात बाळासाहेब थोरात - युतीत विनोद तावडे - महाविकास आघाडीत - जयंत पाटील  
  • रॉयल स्टोन - आघाडीच्या काळात जयंत पाटील - युतीत पंकजा मुंडे - महाविकास आघाडीत -एकनाथ शिंदे