खिल्जीची भूमिका पाहिल्यावर आझम खान आठवले: जयाप्रदा

वृत्तसंस्था
शनिवार, 10 मार्च 2018

पद्मावत चित्रपट पाहत असताना मला खिल्जीची भूमिका पाहिल्यावर आझम खानच आठवले. मी ज्यावेळी निवडणूक लढवत होते, तेव्हा आझम खान मला त्रास देत होते. 

लखनौ - पद्मावत चित्रपटातील अल्लाउद्दीन खिल्जी याची भूमिका पाहिल्यानंतर मला समाजवादी पक्षाचे नेते आझम खान आठवल्याचे माजी खासदार जयाप्रदा यांनी म्हटले आहे.

संजय लिला भन्साळी यांच्या पद्मावत चित्रपटात अल्लाउद्दीन खिल्जीची भूमिका हा क्रुरतेने भरलेली दाखविण्यात आली आहे. यावरून जयाप्रदा यांनी आझम खान यांना लक्ष्य केले आहे. या दोघांमध्ये सतत कोणत्यातरी कारणावरून वादविवाद सुरु असतात.

जयाप्रदा म्हणाल्या, की पद्मावत चित्रपट पाहत असताना मला खिल्जीची भूमिका पाहिल्यावर आझम खानच आठवले. मी ज्यावेळी निवडणूक लढवत होते, तेव्हा आझम खान मला त्रास देत होते. 

Web Title: Jaya Prada targets sp leader Azam Khan says film Padmaavat khiljis character