esakal | जयललिता यांच्या बंगल्यात मिळाल्या 'एवढ्या' वस्तू...
sakal

बोलून बातमी शोधा

jayalalithaas house has over 4 kg of gold 601 kg of silver properties by tn government

तमिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री आणि एआयएडीएमकेच्या दिवंगत पक्षप्रमुख जे. जयललिता यांच्या 'पोएस गार्डन' या निवासस्थानातून सरकारने 4 किलो सोने, 610 किलो चांदी, 8 हजार 376 पुस्तके, 38 एअर कंडीशनर आणि 10 हजार 438 ड्रेस ताब्यात घेतले आहेत.

जयललिता यांच्या बंगल्यात मिळाल्या 'एवढ्या' वस्तू...

sakal_logo
By
वृत्तसंस्था

चेन्नई : तमिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री आणि एआयएडीएमकेच्या दिवंगत पक्षप्रमुख जे. जयललिता यांच्या 'पोएस गार्डन' या निवासस्थानातून सरकारने 4 किलो सोने, 610 किलो चांदी, 8 हजार 376 पुस्तके, 38 एअर कंडीशनर आणि 10 हजार 438 ड्रेस ताब्यात घेतले आहेत.

न्यायाधीश आणि मुलाने चपाती खाल्ली अन्....

तमिळनाडू सरकार जयललिता यांचे स्मारक तयार करणार आहे. जयललिता यांचे तमिळनाडू आणि देशभरात लाखो चाहते आहेत. या चाहत्यांसाठी तमिळनाडू सरकार जयललिता यांच्या स्मारकात काही वस्तू प्रदर्शनासाठी ठेवणार आहे. त्यामुळेच सरकारने जयललिता यांच्या 'पोएस गार्डन' या निवासस्थानातून काही महत्त्वपूर्ण वस्तू ताब्यात घेतल्या आहेत. सरकार त्या सर्व वस्तू जयललिता यांच्या स्मारकात प्रदर्शनासाठी ठेवणार आहे. सरकार जयललिता यांच्या 'वेदा निलयम' या तीनमजली घराचे रुपांतर स्मारकात करणार आहे. या स्मारकात पण प्रदर्शन असणार आहे. 'पोएस गार्डन' या निवासस्थानातील बऱ्याच वस्तू प्रदर्शनात ठेवल्या जाणार आहेत.

मणिपूरमध्ये दहशतवाद्यांचा हल्ला; तीन जवान हुतात्मा

जयललिता यांच्या घरातून सरकारने सोने, चांदी, पुस्तके आणि कपड्यांव्यतिरिक्त अनेक वस्तू ताब्यात घेतल्या आहेत. यामध्ये 11 टीव्ही, 10 रेफ्रिजरेटर, 29 मोबाईल आणि टेलिफोन, 394 स्मृतीचिन्ह, 65 सूटकेस, 108 कॉस्मेटिक वस्तू, सहा घड्याळांचा समावेश आहे.