जयललितांची स्वप्नं पूर्ण करणार त्यांची भाची

वृत्तसंस्था
मंगळवार, 17 जानेवारी 2017

चेन्नई- तमिळनाडूच्या दिवंगत मुख्यमंत्री जे. जयललिता यांची स्वप्नं पूर्ण करण्यासाठी आपण राजकारणात प्रवेश करणार आहोत, असं जयललिता यांची भाची दीपा जयकुमार यांनी म्हटलं आहे. 

जयललिता यांच्याप्रमाणेच व्यक्तिमत्व असणाऱ्या दीपा यांनी 'टी'नगर येथील आपल्या निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत वरील घोषणा केली. 
त्या म्हणाल्या, "जयललिता यांची जागा घेऊ शकेल असे कोणीही मला दिसत नाही. ऑल इंडिया अण्णा द्रमुक (AIADMK) पक्षाच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतरच मी राजकारणात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे."

दीपा पुढे म्हणाल्या, "माझ्यासमोर दोन पर्याय आहेत. एक म्हणजे अण्णा द्रमुक पक्षात प्रवेश करायचा किंवा एका नव्या पक्षाची स्थापना करायची असे पर्याय आहेत. यापैकी कोणता पर्याय निवडायचा ते मी माझ्या समर्थकांशी चर्चा करून ठरविणार आहे."

जयललिता यांचा जन्मदिवस 24 फेब्रुवारीला आहे. त्या दिवशी आपला निर्णय जाहीर करणार असल्याचे दीपा यांनी सांगितले. 
 
Web Title: Jayalalithaa's niece Deepa Jayakumar to enter politics