

Bihar MLA Gopal Mandal Stages Protest Outside CM House Over Election Ticket Fear
Esakal
बिहार निवडणुकीचं बिगुल वाजलं आहे. एनडीएकडून जागावाटप जाहीर करण्यात आलं असलं तरी अद्याप कुणीच उमेदवार जाहीर केलेले नाहीत. एनडीए सरकारमध्ये जदयूने जागांची घोषणा करण्याआधीच पक्षानं चिन्ह वाटप सुरू केलंय. यावरून आता पक्षात अंतर्गत धुसफूस सुरू झालीय. जदयूचे आमदार गोपाल मंडल यांना तिकीट कापलं जाण्याची भीती आहे. यामुळे ते थेट मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाबाहेर धरणे आंदोलनाला बसले आहेत.