'जेईई अॅडव्हान्स' परीक्षेचा निकाल जाहीर

वृत्तसंस्था
रविवार, 10 जून 2018

'जेईई अॅडव्हान्स' परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला असून, या परिक्षेत देशात प्रणव गोयल पहिला तर राज्यात ऋषी अग्रवाल हा पहिला आला आहे. या परिक्षेत हरियाणाच्या प्रणव गोयल याला 360 पैकी 337 गुण मिळाले आहेत.

नवी दिल्ली - 'जेईई अॅडव्हान्स' परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला असून, या परिक्षेत देशात प्रणव गोयल पहिला तर राज्यात ऋषी अग्रवाल हा पहिला आला आहे. या परिक्षेत हरियाणाच्या प्रणव गोयल याला 360 पैकी 337 गुण मिळाले आहेत. 

त्याचबरोबर, या परिक्षेत साहिल जैन हा देशातून दुसरा आणि कैलास गुप्ता हा तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्याचबरोबर मिनल पारेख हिने 360 पैकी 318 गुण मिळवत मुलींमधून पहिला क्रमांक मिळवला आहे. 

देशभरात आयआयटी, एनआयटी अशा संस्थांच्या प्रवेशासाठी ही 'जेईई अॅडव्हान्स' ही परीक्षा घेतली जाते. तिची निकाल आज आयआयटी कानपूरने जाहीर केला. jeeadv.ac.in या अधिकृत संकेतस्थळावर हा निकाल विद्यार्थी पाहु शकतात. २० मे रोजी आयआयटी कानपूरच्या वतीने देशभरातील विविध केंद्रांवर हा परीक्षा घेण्यात आली होती.

Web Title: JEE Advanced results announced, Panchkula boy Pranav Goyal tops exam

टॅग्स