JEE Main 2021: जेईई मेन्स परीक्षेच्या सॉफ्टवेअरमध्ये छेडछाड, रशियन नागरिक CBIच्या ताब्यात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

CBI

JEE Main 2021: जेईई मेन्स परीक्षेच्या सॉफ्टवेअरमध्ये छेडछाड, रशियन नागरिक CBIच्या ताब्यात

जेईई मेन २०२१ (JEE Mains 2021) परीक्षेच्या सॉफ्टवेअरमध्ये छेडछाड प्रकरणी कथित सहभागावरून एका रशियन नागरिकाला सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन (CBI) ने अटक केली आहे. त्याची चौकशी करण्यात येत आह.अधिकाऱ्यांनी सोमवारी ही माहिती दिली. सीबीआयने गेल्या वर्षी झालेल्या आयआयटी जेईई (मुख्य) परीक्षेतील कथित फेरफारच्या चौकशीच्या संदर्भात इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर एका रशियन नागरिकाला अटक केली आहे.

केंद्रीय अन्वेषण ब्युरो (CBI) ने या परीक्षेत कथित छेडछाड केल्याप्रकरणी मुख्य हॅकर असल्याचा संशय असलेल्या परदेशी नागरिकाविरुद्ध 'लुक आऊट परिपत्रक' जारी केले होते. मिखाईल शार्गिन असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याला ताब्यात घेण्यात आले तेव्हा तो कझाकिस्तानमधून भारतात आला होता.

एका निवेदनात म्हटले आहे की तपासादरम्यान जेईई (मुख्य) सह अनेक ऑनलाइन परीक्षांमध्ये फेरफार करण्यात काही परदेशी नागरिकांचा सहभाग असल्याचे उघड झाले आहे. तसेच या प्रकरणी एका रशियन नागरिकाची भूमिका उघड झाली आहे ज्याने iLeon सॉफ्टवेअरशी छेडछाड केली होती (ज्या प्लॅटफॉर्मवर JEE (मुख्य)-2021 परीक्षा घेतली होती) आणि परीक्षेदरम्यान संशयित उमेदवारांची संगणक प्रणाली हॅक केली होती. असे करण्यात इतर आरोपींना मदत केली होती.

हेही वाचा: CNG-PNG Price Hike: महागाईचा भडका! ऐन सणासुदीत सीएनजी, पीएनजी दरात मोठी वाढ!

परदेशातून रशियन नागरिक विमानतळावर आल्यावर केंद्रीय यंत्रणांनी सीबीआयला अलर्ट केले, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. सीबीआयने ताबडतोब त्याला रोखले आणि जेईई परीक्षेत छेडछाड केल्याप्रकरणी त्याची चौकशी सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे. एजन्सीने गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये अॅफिनिटी एज्युकेशन प्रायव्हेट लिमिटेड आणि तिचे तीन संचालक - सिद्धार्थ कृष्णा, विश्वंभर मणी त्रिपाठी आणि गोविंद वार्ष्णेय यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. तसेच अन्य काही लोकांवर देखील गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या तिन्ही संचालकांनी जेईई (मुख्य) ऑनलाइन परीक्षेत फेरफार करून उमेदवारांकडून मोठ्या प्रमाणात पैसे घेऊन त्यांना देशातील आघाडीच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी संस्थांमध्ये प्रवेश मिळवून देण्यासाठी कट रचल्याचा आरोप आहे. आरोपानुसार, हरियाणातील सोनीपत येथील निवडक परीक्षा केंद्रातून अर्जदारांच्या प्रश्नपत्रिका तंत्रज्ञानाच्या मदतीने सोडवल्या जात होत्या.

हेही वाचा: Shivsena : 'मन मोठं करून जसं शिवाजी पार्क दिलं तशी सत्ताही द्या'

टॅग्स :JEE Main