परीक्षा केंद्रावर मास्क वाटप, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करत विद्यार्थ्यांनी लावल्या रांगा

सकाळ ऑनलाईन टीम
Tuesday, 1 September 2020

कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर परीक्षा केंद्रावर सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. परीक्षा केंद्रावर पोहचणाऱ्या विद्यार्थ्यांची तपासणी करुनच त्यांना परीक्षा हॉलमध्ये प्रवेश देण्यात आला.   

JEE Main 2020: कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर नीट आणि जेईई परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली होती. इंजिनियरिंगच्या प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या जेईई मुख्य परीक्षेला देशभरात आजपासून सुरुवात झाली. राष्ट्रीय परीक्षा एजन्सीने यासंदर्भात संपूर्ण तयारी केली आहे. देशभरातून जवळपास 8.58 लाख विद्यार्थी या परीक्षेला बसणार आहेत. परीक्षा 1 से 13 सप्टेंबर दरम्यान वेगवेगळ्या टप्प्यात पार पडणार आहे. 

भारतीय वंशाचे प्रीतम सिंह सिंगापूरचे विरोधी पक्षनेते

देशातील वेगवेगळ्या  केंद्रावर घेण्यात येणाऱ्या परीक्षेसाठी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्याच्या सूचना यापूर्वीच देण्यात आल्या आहेत. सर्वच परीक्षा केंद्रावर याची अंमलबजावणी होताना दिसत आहे. केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी विभिन्न राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना परीक्षा केंद्रावर आवश्यक त्या बाबींची पूर्तता करण्याचे आवाहनही केले होते. अभूतपूर्व परिस्थितीत पार पडणाऱ्या परीक्षेसाठी ज्या त्या राज्यातील मुख्यमंत्र्यांनी विद्यार्थ्यांना आवश्यक ती मदत करावी, असे ते म्हणाले होते.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

 कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर परीक्षा केंद्रावर सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. परीक्षा केंद्रावर पोहचणाऱ्या विद्यार्थ्यांची तपासणी करुनच त्यांना परीक्षा हॉलमध्ये प्रवेश देण्यात आला.   

 

गोवा : पणजी येथील परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांनी मास्कसाठी रांग लावल्याचे पाहायला मिळाले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: jee mains 2020 jee exam begins today read here latest updates all Exam Center