धक्कादायक! JEE Mains च्या टॉपरनं डमी बसवून मिळवले 99.8 टक्के

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 29 October 2020

जेईई मेन्स परीक्षेमध्ये ९९.८ टक्के गुण मिळविले होते. या प्रकरणी टेस्टिंग सेंटरच्या तीन कर्मचाऱ्यांनाही अटक करण्यात आली आहे.

गुवाहाटी -  जेईई मेन्स परीक्षेतील आसाममधील टॉपर नील नक्षत्र दास, त्याचे वडील डॉ. ज्योतिर्मय दास आणि आणखी तीन जणांना पोलिसांनी आज अटक केली. परीक्षेला तोतया उमेदवार बसविल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.

नील नक्षत्र दासने जेईई मेन्स परीक्षेमध्ये ९९.८ टक्के गुण मिळविले होते. या प्रकरणी टेस्टिंग सेंटरच्या तीन कर्मचाऱ्यांनाही अटक करण्यात आली आहे. हेमेंद्रनाथ शर्मा, प्रांजल कलिता आणि हरुलाल पाठक अशी त्या कर्मचाऱ्यांची नावे आहेत. यातून मोठा गैरव्यवहार बाहेर येऊ शकतो, असे पोलिसांचे म्हणणे आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी नील नक्षत्र दास हा परीक्षा केंद्रावर गेला होता. त्याने नाव आणि परीक्षा क्रमांक लिहिला आणि त्यानंतर तो केंद्रातून बाहेर आला. नंतर त्याच्या नावाने दुसऱ्या कोणीतरी प्रश्नपत्रिका सोडविली. पोलिसांनी याची माहिती नॅशनल टेस्टिंग एजन्सीलाही दिली आहे.पोलिसांनी अटक केलेल्या सर्वांना आज न्यायालयात हजर करण्यात आले होते. त्यांना पाच दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे.

हे वाचा - कोरोना व्हॅक्सिनचं उत्पादन सुरू; सीरमच्या CEOनी दिली माहिती

ग्लोबल डिलाईट या संस्थेतील भार्गव डेका याने नील नक्षत्र दास व त्याच्या वडिलांशी संगनमताने तोतया उमेदवार बसविण्यासाठी पैसे घेतल्याचेही उघडकीस आले आहे. डेका अद्याप फरार आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: jee-mains-topper-in-assam-used-proxy-for-exam get 99 percent mark