जेट एअरवेजच्या 14 फेऱ्या रद्द; विमान प्रवाशांचे हाल

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 3 डिसेंबर 2018

मुंबई, ता.3: आर्थिक संकटातून जात असलेल्या जेट एअरवेज समोर आता नवीन समस्या निर्माण झाली आहे. दोन महिन्याचा पगार न मिळाल्याने सिनियर विमान चालकांनी रविवारी तब्बेतीचे कारण देत, सुट्या घेतल्या आहे. त्यामुळे मुंबई विमानतळावरून विविध भागात जाणाऱ्या जेट एअरवेजच्या 14 फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहे.

सूत्रांनी सांगितल्याप्रमाणे, जेट ऐअरवेज विमान कंपनी सध्या आर्थिक संकटातून जात आहे. एक हजार 261 करोड रुपयाने कंपनी घाट्यात असल्याची माहिती जेट ऐअरवेज प्रशासनाने जाहीर केले होते. त्यानंतर विमान चालकांचे गेल्या दोन महिन्याचे पगार न झाल्याने कामावर येण्यास नापसंती दाखवली आहे.  महत्वाच म्हणजे यामध्ये संपूर्ण विमान चालक हे सिनियर्स आहेत. तर यासंदर्भात चालकांकडून कंपनी प्रशासनाला पत्र पाठवून अशा परिस्थितीत काम करता येणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.

कंपनीने मात्र 14 फेऱ्या रद्द होण्याचे कारण 'आकस्मित परिस्थिती' सांगितली आहे. तर नेमकी काय समस्या आहे. यासंदर्भात जेट ऐअरवेज प्रशासन अद्यापही बोलायला तयार नाही.

जेट एअरवेजच्या 14 फेऱ्या रद्द झाल्याने विमान प्रवाशांना मात्र चांगलाच मनस्ताप सहन करावा लागतो आहे. आधीच बुकिंग करून निश्चित झालेल्या प्रवाशांना आता, इतर विमानात सिट मिळावी, यासाठी धावपळ करावी लागत आहे. त्यामुळे जेट ऐअरवेजने प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे.

Web Title: Jet Airways Cancels 14 Flights