
Jet Airways | अखेर जेट एअरवेजला हवाई उड्डाणासाठी मिळाली परवानगी
दिल्ली : केंद्रीय नागरी हवाई संचालनालयाने (DGCA) शुक्रवारी (ता.२०) एअर ऑपरेटर सर्टिफिकेट जेट एअरवेज (Jet Airways) या विमान कंपनीला मंजूर केले आहे. तीन वर्षानंतर विमान कंपनीला आपली हवाई सेवा पुन्हा सुरु करता येणार आहे. कर्जामुळे कंपनीची सेवा बंद करण्यात आली होती. एकेकाळी लोकप्रिय असलेल्या विमान कंपनीची १७ एप्रिल २०१९ नंतर उड्डाण बंद झाले होते. त्यावेळी कंपनीचे नरेश गोयल (Naresh Goyal) मालक होते. (Jet Airways Gets Dgca clearance to resume flight operations)
हेही वाचा: शरद पवारांची भूमिका कधी कुणाला कळली आहे का? - देवेंद्र फडणवीस
जेट एअरवेजला डीजीसीएकडून हवाई उड्डाणाची परवानगी तब्बल तीन वर्षानंतर मिळाली आहे. या महिन्यापूर्वी केंद्रीय गृहमंत्रालयाने जेट एअरवेज, जालान कालराॅक कन्सोर्टियमला संरक्षणविषयक मंजुरी दिली होती. विमान कंपनीने अगोदरच बोईंग ७३७ विमानाच्या मदतीने हैदराबाद येथून टेस्ट फ्लाईट्स घेतली होती. जेट एअरवेजने २०० पेक्षा अधिक लोकांना नोकरीवर घेतले आहे. जेटला उड्डाणाची हवाई नियामकाकडून मंजुरीची प्रतिक्षा होती.
Web Title: Jet Airways Gets Dgca Clearance To Resume Flight Operations
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..