गोवा-मुंबई विमान घसरलं, पण दुर्घटना टळली

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 27 डिसेंबर 2016

पणजी- गोव्यातील दाभोळी आंतरराष्ट्रीय विमानतळावरील धावपट्टीवरून उड्डाण घेणारे विमान घसरले, मात्र यामध्ये कोणतीही हानी न झाल्याने मोठी दुर्घटना टळली. जेट एअरवेज या हवाई वाहतूक कंपनीचे विमान गोव्यावरून मुंबईकडे जाण्यासाठी उड्डाण घेत असताना ही घटना घडली. 

जेट एअरवेजच्या व्यवस्थापनाने दिलेल्या माहितीनुसार, ‘9W 2374’ या विमानातील प्रवाशांसह सर्व कर्मचारी सुखरूप बचावले आहेत. या विमानात 154 प्रवासी आणि 7 विमान कर्मचारी होते. तांत्रिक बिघाडामुळे हे विमान धावपट्टीवरून घसरले. या घटनेनंतर दाभोळी विमानतळावरील उड्डाणे आज (मंगळवार) दुपारी साडेबारा वाजेपर्यंत रद्द करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. 

जेट एअरवेजने सांगितले की, हे विमान मुंबईकडे जाण्यासाठी उड्डाण घेत असताना ते धावपट्टीवरून घसरले. त्यातील सर्व प्रवासी आणि कर्मचारी सुखरूप आहेत. काही प्रवाशांना अगदी किरकोळ जखम झाली आहे. वैद्यकीय मदत घटनास्थळी पोचली असून, जेट एअरवेजचे कर्मचारी आणि दाभोळी विमानतळ प्रशासन मदतकार्य करीत आहेत.”

Web Title: Jet Airways goa to mumbai flight skids off, no casualty