esakal | जेट एअरवेज पुन्हा घेणार उड्डाण
sakal

बोलून बातमी शोधा

Jet Airways

जेट एअरवेज पुन्हा घेणार उड्डाण

sakal_logo
By
सुधीर काकडे

जेट एअरवेजने (Jet Airways) आपली विमान वाहतूक सेवा पुन्हा सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. नवी दिल्ली ते मुंबई या पहिल्या फ्लाईटसोबत कंपनी २०२२ या नवीन वर्षात पुन्हा एकदा कम बॅक करणार आहे. तसेच लवकरच कंपनी आपली आंतरराष्ट्रीय सेवा देखील सुरु करणार असल्याचे सांगितले आहे. अधिकाऱ्यांशी चर्चा करुन पुढील उड्डाणांचे स्लॉट ठरवण्यात येतील असे कंपनीकडून यावेळी सांगिण्यात आले आहे. मोठ्या प्रमाणात झालेल्या नुकसानीनंतर कंपनीने आपली सेवा बंद केली होती.

एप्रिल २०१९ पासून बंद असलेली जेट एअरवेजची सेवा पुन्हा एकदा सुरु होणार आहे. कंपनीने आपली सेवा पुन्हा सुरु करण्यासाठी नवी योजना आखली असून या अंतर्गत टप्प्या टप्प्याने सेवा सुरु करण्यात येणार आहे. त्यानूसार सुरुवातील ५० विमानांपासून ते पुढे १०० विमानांपर्यंत ही सेवा वाढवण्यात येणार आहे. युनायटेट अरब अमिरात स्थित मुरारी लाल जालान यांनी ही माहिती दिली आहे.

हेही वाचा: पेगासस प्रकरणात शपथपत्र दाखल करण्यास केंद्राकडून टाळाटाळ?

दरम्यान, एप्रिल २०१९ मध्ये कंपनी तोट्यात गेल्यानंतर सेवा बंद करण्यात आली होती. त्यानंतर दोन वर्षांनी कंपनीने पुन्हा आपली सेवा सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे.

loading image
go to top